World Hindi Day 2024 : हिंदी भाषा येत असेल तर 'या' क्षेत्रात करा करिअर, मिळेल चांगली नोकरी आणि भरघोस पगार

जागतिक हिंदी दिवस दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
World Hindi Day 2024 : हिंदी भाषा येत असेल तर 'या' क्षेत्रात करा करिअर, मिळेल चांगली नोकरी आणि भरघोस पगार
Updated on

जागतिक हिंदी दिवस दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरात हिंदीचा प्रचार-प्रसार करण्याचा आहे. तसेच हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळख देण्याचाही हेतू आहे. 

जागतिक हिंदी दिवस आणि हिंदी दिवसात फरक आहे. हिंदी दिवस 14 सप्टेंबरला साजरा केला जातो, तर जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारीला साजरा केला जातो.

देशाबाहेरही हिंदीने आपली पकड मजबूत केली आहे. अशा परिस्थितीत तरुणांना अनेक नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. आजकाल हिंदीमध्ये करिअरला भरपूर वाव आहे. जर तुम्ही तुमचे ग्रॅज्युएशन हिंदीतून केले असेल तर तुम्ही सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकता.

World Hindi Day 2024 : हिंदी भाषा येत असेल तर 'या' क्षेत्रात करा करिअर, मिळेल चांगली नोकरी आणि भरघोस पगार
World Hindi Day 2024 : भारताच्या व्यतिरिक्त 'या' देशांमधील लोक बेधडकपणे बोलतात हिंदीत

शिक्षक

हिंदीतून बी.ए. एम.ए. आणि जे पीएचडी करतात ते मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमध्ये प्रोफेसर होऊ शकतात. तसेच बीएड करणारेही सरकारी शाळांमध्ये शिक्षक होऊ शकतात.

जर्नालिस्ट

हिंदीतून पदवी घेतलेल्यांसाठी हिंदी माध्यमांमध्ये भरपूर संधी आहेत. हिंदी विद्यार्थी पत्रकारितेचा कोर्स करून मीडियामध्ये नाव कमवू शकतात.

फिल्म स्क्रिप्ट राइटर

तुमच्याकडे शब्दांशी खेळण्याची कला असेल तर तुम्ही स्क्रिप्ट रायटर बनून तुमचे करिअर करू शकता. आजकाल बाजारात चांगल्या पटकथा लेखकांची कमतरता आहे. त्यामुळे हे क्षेत्र तुमच्यासाठीही उत्तम आहे.

यूपीएससी

यूनियन पब्लिक सर्विस कमीशन म्हणजेच UPSC दरवर्षी शेकडो भरती करते, त्यापैकी काही पदे हिंदी भाषेसाठीही असतात. ज्या विद्यार्थ्यांची हिंदीवर पकड आहे ते हिंदीतून यूपीएससीची तयारी करून आयएएस होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.