World's Best School Award 2023 : दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या ५ भारतीय शाळांना जगातल्या सर्वात मोठ्या शाळा पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट १० शाळांमध्ये निवडण्यात आलं आहे. या शाळा वेगवेगळ्या विभागांसाठी शॉर्टलिस्ट झाल्या आहेत. या पुरस्काराचं बक्षिस अडीच लाख यूएस डॉलर्स आहे. सामाजिक प्रगतीत शाळांचे योगदान आणि जगभरातील शाळांना साजरे करण्यासाठी इंग्लंडमध्ये वर्ल्ड्स बेस्ट स्कूल अवॉर्डचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सामुदायिक सहयोग, पर्यावरणाशी निगडीत योगदान, इनोव्हेशन, अडचणींवर मात करणे आणि आरोग्यदायी जीवन जगणे या पाच विभागात विभागलेली आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून शाळांना समाजाची पुढची पिढी घडवण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी प्रोत्साहित केलं जातं.
यंदा ५ भारतीय शाळा या स्पर्धेत सहभागी आहेत. एज्युकेशन अँड द वर्ल्ड्स बेस्ट स्कूल प्राइजचे संस्थापक विकास पोटा म्हणाले, "जगभरातल्या शाळा या भारतीय संस्था आणि त्यांच्या सांस्कृतिक कहाणीतून शिकतील."
या पुरस्कारासाठी निवडलेल्या शाळा कुठे आहेत, काय शिकवतात याने काहीच फरक पडत नाही. त्यांच्यात एक गोष्ट समान असते ती म्हणजे त्यांच्यात असलेली मजबूत शालेय संस्कृती. त्यांचे प्रमुख असाधारण शिक्षकांना आकर्षित आणि प्रेरीत करणं जाणतात. ते परीवर्तनाला प्रेरणा देतात आणि उत्कृष्ट शिक्षण आणि शिक्षणाच्या वातावरण निर्माण करतात, असंही पोटा यांनी सांगितलं.
शॉर्टलिस्ट झालेल्या शाळा
भारतीय शाळांमध्ये 'नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय (NPBV) एफ-ब्लॉक, दिलशाद कॉलनी' यांचा समावेश आहे. ही सामुदायिक सहकार्य श्रेणी अंतर्गत दिल्लीची एक सरकारी शाळा आहे.
या वर्गात ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल, मुंबईचा देखील समावेश आहे जी खाजगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे.
रिव्हरसाइड स्कूल, अहमदाबाद, गुजरात ही देखील एक खाजगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे.
'स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, महाराष्ट्र' ही अहमदनगरमधील एक धर्मादाय शाळा आहे ज्याने एचआयव्ही/एड्स ग्रस्त मुलांचे आणि लैंगिक कामगार कुटुंबातील मुलांचे जीवन बदलले आहे.
पाचवी शाळा 'शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल (द आकांक्षा फाउंडेशन), मुंबईतील एक चार्टर स्कूल आहे.
पुरस्काराच्या अंतिम फेरीत प्रत्येक श्रेणीसाठी टॉप 3 फायनलिस्ट काढले जाती. याची घोषणा सप्टेंबरमध्ये होईल. विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये होईल. अडिच लाख अमेरिकी डॉलर्सची रक्कम पाचही श्रेणीच्या विजेत्यांमध्ये समान वाटली जाईल. प्रत्येकाला 50 हजार अमेरिकी डॉलर चा पुरस्कार मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.