नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे (MUHS) उन्हाळी सत्र २०२२ च्या दुसऱ्या टप्यातील परीक्षांना शुक्रवार (ता.१५) पासून सुरवात होत आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस सुरू असला तरी लेखी परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट केले आहे. पुराच्या पार्श्वभूमिवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना परीक्षा केंद्र समन्वयकांना दिलेल्या असल्याचे सांगितले जात आहे. (Latest Marathi News)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ च्या पहिल्या सत्रातील लेखी परीक्षा पार पडलेली आहे. दुसऱ्या टप्यातील परीक्षा १ जुलैपासून राज्यभरात घेतली जाणार होती. परंतु जून अखेरीस यासंदर्भात परिपत्रक काढत पंधरा दिवसांसाठी परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानुसार आता शुक्रवार (ता.१५) पासून या लेखी परीक्षा पार पडणार आहेत. पदवी व पदव्युत्तर पदवी अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षा होतील.
पदवी अभ्यासक्रमांतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बी.एस्सी, फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी आदी शिक्षणक्रमांची लेखी परीक्षा होईल. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात डॉक्टर ऑफ मेडिसिन (डीएम), एमडीएस, डिप्लोमा डेटिस्ट्री, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, डिप्लोमा आयुर्वेद, एम.एस्सी. नर्सिंग, फिजिओथेरपी व एम.एस्सी.तील विविध विषयांचा समावेश आहे. याशिवाय विद्यापीठ स्तरावरील विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षा या सुधारीत वेळापत्रकानुसार होतील. ४ ऑगस्टपर्यंत या लेखी परीक्षा राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर पार पडतील.
''विद्यार्थी हिताचा विचार करता निर्धारीत वेळापत्रकानुसार शुक्रवारपासून लेखी परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. राज्यातील पाऊस, व कोरोनाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना परीक्षा केंद्र समन्वयकांना दिलेल्या आहेत.'' - डॉ. संदीप कडू, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.