आशियातील नामांकित आंतरमहाविद्यालयीन 'मल्हार' महोत्सव संपन्न; वाचा सविस्तर

Malhar festival
Malhar festivalsakal media
Updated on

मुंबई: आशियातील (Asia) सर्वात जुना व सर्वात मोठा आंतरमहाविद्यालयीन (intercollegiate) महोत्सव ओळखला जाणारा मल्हार (malhar festival) २९ ऑगस्टला संपन्न झाला. एरव्ही ३ दिवस होणारा हा संत झेवियर्स (Xavier's college) महाविद्यालयाचा फेस्ट यंदा एक दिवसाच्या भेटीला ऑनलाईन (online fest) आला. साल २०२१ साठी मल्हारची थीम (malhar theme) "पॅरलॅक्स: द लेगसि रिरुटेड" आहे.

Malhar festival
मुंबई विद्यापीठाला मिळाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा

मल्हारची संस्कृती निरनिरळे कार्यक्रम आयोजित करून राखली जाते. त्यात विदयार्थी, प्राध्यापक, प्रेक्षक आणि बऱ्याच लोकांचं योगदान असते. मल्हार सामाजिक समावेशकतेवर जोर देतं. त्यासाठी प्री-इव्हेंट म्हणून संजय मुंगी आणि चेशिर होम्स चे गोपाळ मोटवानींसारख्या परोपकारी व्यक्तिमत्त्वाने साईन लँग्वेज वर्कशॉप 16 ऑगस्टला आयोजित केले. सामाजिक समावेशाची प्रथा निरंतर राखण्यासाठी, हेमकंत फाउंडेशनच्या सहकार्य ने 25 ऑगस्टला डान्स वर्कशॉप आयोजित केले. वर्कशॉचे सर्व पैसे कोविड रिलीफला दान केले गेले.

त्यासोबतच वर्ल्ड टॅग chairs च्या संगतीने "Who wants to be the next CHAIRperson" सोशल मीडिया कॉनटेस्ट आयोजित केली गेली. विजेत्यांना डिझाईन केलेली रु.१०,००० किमतीची खुर्ची पुरस्कार म्हणून देण्यात आली. मल्हार कॉनक्लेव, परफॉर्मिंग आर्ट्स, फाईन आर्ट्स आणि अनेक इव्हेंट्स शिवाय अपुरा आहे. सकाळी ९च्या ठोक्याला महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. राजेंद्र शिंदेंनी मल्हारचा प्रारंभ घोषित केला. फेस्टीवल 'Paytm' इन्साईडर वर 4 स्क्रीन्स वर प्रकाशित केला गेला.

समाज संबंधित वाद-विवादचा उद्देश ठेवून कॉनक्लेवचे प्रमुख स्पीकर उरी सर्जिकल स्स्ट्रईक कमांडर जनरल सतीश दुआ होते. जनरल सतीश दुआ यांनी आजच्या पिढीला त्यांचा आवडी जोपासायचा संदेश दिला. पुढील भाग सोशल ओन्ट्रप्रेनर्सच्या मुलाखतीचा होता. डॉ. उर्वशी साहनी, सुनीता घोस आणि अनुराग चौहान सारख्या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्तांनी समाजकार्य प्रती संवेदनशीलता वाढवण्याचा सल्ला दिला.

Malhar festival
पदवी प्रवेशाचा 'या' शाखेकडेच सर्वाधिक कल; सेंट झेवियर्समध्ये अतिरिक्त तुकडी

कॉनक्लेवच्या 'द मल्हार आईकॉन' मध्ये बहुमुखी सहभागिदरांनी भाग घेतला. रोंदेवू मध्ये सामाजिक धोरण आणि सुधारणांवर चर्चा झाली. कॉनक्लेवच्या संध्याकाळच्या टप्प्यात, ' आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एथिक्स ' वर टिप्पणी देण्यासाठी ऑक्सफर्डचे प्राध्यापक डॉ. जॉन लेंनॉक्स हजर होते. शिवाय, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे पूर्व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि गोदरेज कन्सुमर प्रॉडक्ट्सचे नियुक्त सीईओ सुधीर सितापतींनी कॉलेज मध्ये असताना त्यांचा मल्हारच्या आठवणी सांगितल्या. लेखक अनिता नायरने सर्जनशीलता जोपासण्याचा संदेश दिला. गायक अभिजीत श्रीवास्तव आणि इमचा इमचेनने कॉनक्लेवचे अंतिम शिखर गाठले.

लिटररी आर्ट्सचा इव्हेंट 'अ टेल ऑफ टू टेल्स' दोन वेगळ्या काहण्यांची मुलाकात एक दुसऱ्याशी घडवते. सहभाग घेणाऱ्यांनी त्याक्षणी एक अद्भुत संवाद तयार करायचा होता. 'क्विजिन' प्रश्नमंजुषा मध्ये निरनिराळ्या प्रश्नांवर सहभाग घेणाऱ्यांचा कस लागला. फाईन आर्ट्सच्या 'द दोट्टींग पराडॉक्स' मध्ये बोटांनी, पेन्सिल किंवा इअरबडने चित्र निर्माण करायचे होते. 'लाईन इट अप' मध्ये फक्त रेषांनी डिजिटल आर्ट बनवायचे होते. 'एम्प्टी वेसल्स मेक अ शॉट' मध्ये भांड्यांचे फोटो घ्यायचे होते.

परफॉर्मिंग आर्ट्सवर प्रेक्षकांचं विशेष लक्ष होतं. 'वन्स अपॉन ऑनलाइन' ह्या इव्हेंट मध्ये जोडीने झूम कॉल वरचे नाटक पेश करायचे होते. 'अंग्रेजी बीट' आणि 'बॅक टू द फ्युजन' डान्स इव्हेंट होते. आपल्या संस्कृतीच्या समृद्धतेला सन्मान देऊन, 'ताल इस वेल' शास्त्रीय संगीत प्रतियोगिता झाली. टेक्निकल (टेक्स) विभागाने चेस टुर्नामेंट आणि फिफा गेम असे ई-स्पोर्ट्स आयोजित केले. मल्हार 2021 चा वारसा जिवंत ठेवत त्याचा दीप अधिकतम उज्ज्वल चमकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.