Chinchwad Bypoll Election: अजित पवारांच्या हुकमी एक्क्याने नाना काटेंच्या विजयासाठी सर्वस्व लावलं पणाला

पुण्यातील पोटनिवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे
Chinchwad By Poll Election
Chinchwad By Poll Electionesakal
Updated on

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांच्या प्रचारांच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या नंतर आज दोन्ही जागांसाठी मतदान पार पडत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने केलेल्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेत्यांच्या फौजा प्रचारासाठी पुण्यात तळ ठोकून होत्या.

दोन्हीही बाजूने स्टार प्रचारकांची कोणतीच कमी नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील या निवडणूकीत उतरले होते. चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादीने कंबर कसली होती.

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास राष्ट्रवादीने केला आहे. असं समजलं जात असलं तरी देखील २०१४ पासून याच शहरात राष्ट्रवादीला मतदारांनी खड्या सारखं बाजूला केलं. २०१४ च्या विधान सभेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका देखील राष्ट्रवादीच्या हातातून गेली आणि संपुर्ण शहरावर भाजपची सत्ता आली.

Chinchwad By Poll Election
पुणे तिथे काय उणे! मतदारांनी बाहेर पडून मतदान करावं यासाठी पुणेकरांची अनोखी शक्कल Kasba Bypoll Election

त्यामुळे राष्ट्रवादी आणि अजित पवार यांना मोठा धक्का बसला. २०१९ ला देखील मतदारांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाची टीक टीक काय चालू दिलं नाही. मात्र लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागली आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सुत्र फिरवली.

दरम्यान मावळमध्ये भाजपच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावणाऱ्या युवा आमदाराच्या हाती या पोटनिवडणूकीची सुत्रं पवारांनी दिली. मावळचे आमदार सुनिल शेळके यांची अजित पवार यांनी चिंचवड मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून नेमणूक केली.

चिंचवडमध्ये पक्षाचे ढिगभर पदाधिकारी आहेत तरी देखील अजित पवारांनी सुनिल शेळके यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली. शेळके यांनी देखील ती जबाबदारी चोखपणे पार पाडली.

चिंचवड मतदारसंघ खुप मोठा आहे याचा अंदाज घेत शेळके यांनी वार्डनिहाय, गावनिहाय रणनिती आखली. स्थानिक कार्यकर्त्यांच्या संभाव्य फितूरीचा अंदाज घेत शेळके यांनी थेट मावळ विधानसभा मतदार संघातील तब्बल दीड हजार कार्यकर्त्यांची फौज चिंचवडमध्ये तैणात केली अशी माहिती सुत्रांनी दिली.

यानंतर आमदार सुनिल शेळके चिंचवडमध्ये गुलाल उधळण्याच्या हेतूने मैदानात उतरले. शेळके यांनी मविआचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यापासून ते अजित पवारांच्या रोड शो दरम्यान २० किलो मीटर अंतर चालत पार करण्यापर्यंत शेळकेंनी स्वत:हा वाहून घेतले.

जर २ मार्चला राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा विजय झाला तर या विजयात सिंहाचा वाटा आमदार सुनिल शेळके यांचा असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.