बिजू जनता दलानं भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव केलाय.
भुवनेश्वर : ओडिशातील त्रिस्तरीय पंचायतराज संस्थांच्या (Zilla Parishad Election) नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल रविवारी, 13 मार्च रोजी घोषित करण्यात आले. यात सत्ताधारी बिजू जनता दलानं (BJD) राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांमध्ये विरोधी भाजप (BJP) आणि काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांचा पराभव केलाय. नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलानं एकूण 851 जागांपैकी 766 जागा जिंकल्या आणि विक्रमी 52.73 टक्के मतं मिळविली.
ओडिशामधील सर्व 30 जिल्हा परिषदांमध्ये बिजू जनता दलाच्या (Biju Janata Dal) अध्यक्षांची निवड झालीय, त्यापैकी 20 महिला जिल्हाध्यक्ष आहेत. तसेच बहुतांश उच्चशिक्षित आणि तरुण आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बीजेडीवर विश्वास दाखवल्याबद्दल मतदारांचे आभार मानले असून हा महत्त्वपूर्ण विजय असल्याचं म्हंटलंय. या मोठ्या विजयानंतर पुरीचे बीजेडी खासदार पिनाकी मिश्रा (Pinaki Mishra) यांनी ट्विटरव्दारे लिहिलंय, ओडिशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच पक्षाचे जिल्हा परिषद अध्यक्ष बनले आहेत. बीजेडीचा हा अभूतपूर्व विजय आहे. तसेच ओडिशातील बिजू जनता दलाच्या जिल्हा परिषद अध्यक्षांपैकी 70% महिला असून त्यांचं सरासरी वय 41 वर्षे आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
सरस्वती मांझी (वय 23) यांची रायगडा जिल्ह्यातील दुर्गम काशीपूर ब्लॉकमधून सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवड झालीय. बीएससी पदवीधर सरस्वती मांझी (Saraswati Manjhi) या पदासाठी एकमेव उमेदवार होत्या आणि त्यांची बिनविरोध निवड झालीय. मांझी त्यांच्या भागातील विकास कामांचं नेतृत्व करणार आहेत. इतर उमेदवारांमध्ये बलांगीर जिल्ह्यातील देबाकी साहू, बरगढमधील मानिनी भोई, झारसुगुडामधील तुलाबती मिंज, ढेंकनालमधील अर्चना पुहाना, नबरंगपूरमधील मोतीराम नायक, नयागढमधील देबाशीष पटनायक, पुरीमधील स्वप्ना राणी स्वेन, अंगुलमधील बबिता प्रधान आणि प्रभास जिल्ह्यातील बोगली यांचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.