Arun Goel Resign : निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसाठी शुक्रवारी मोदींच्या उपस्थितीत बैठक?, 'या' तारखेला लागू शकते आचारसंहिता

Arun Goel Resign : अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगात एकमेव सदस्य उरला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन आयुक्ताच्या नेमणुकीसाठी चालू आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Arun Goel Resign
Arun Goel Resignesakal
Updated on

Arun Goel Resign : अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगात एकमेव सदस्य उरला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन आयुक्ताच्या नेमणुकीसाठी चालू आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. तत्पूर्वी अरुण गोयल यांनी आयुक्तपदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली होती. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका चालवली आहे.

आयोगात आयुक्तपदाची दोन पदे सध्या रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी येत्या 15 तारखेला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक होऊ शकते. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी हेही निवड समितीत आहेत.

Arun Goel Resign
Ranji Trophy Final : पहिले सत्र विदर्भाचे! रणजी फायनल सामन्यात मुंबईच्या खराब फलंदाजांवर सचिन तेंडूलकर बरसला

येत्या तीन दिवसांत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे राज्यांचे दौरे पूर्ण होणार आहेत. दौरे पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. मात्र तत्पूर्वी नवीन निवडणूक आयुक्त नेमणे सरकारसाठी क्रमप्राप्त ठरले आहे.

एप्रिल-मे मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका जाहीर झाल्या झाल्या आदर्श आचारसंहिता लागू होईल. आयुक्तपदाचा राजीनामा दिलेल्या गोयल यांची नेमणूक वादग्रस्त ठरली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या नेमणुकीवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. 2027 साली गोयल यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र कोणतेही कारण न देता त्यांनी शनिवारी राजीनामा दिला. विशेष म्हणजे त्यांचा हा राजीनामा राष्ट्रपतींनी लगोलग मंजूर केला आहे.

Arun Goel Resign
Rohit Pawar : ''जेव्हापासून अजित पवारांनी पक्ष चोरलाय, तेव्हापासून ईडीने जोर धरलाय...'', जप्तीच्या कारवाईवरुन रोहित पवार थेटच बोलले

अरुण गोयल पंजाब केडरचे 1985 बॅचचे आयएएस आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये ते भारतीय निवडणूक आयोगात रुजू झाले होते. 7 डिसेंबर 1962 रोजी पतियाळा येथे जन्मलेले अरुण गोयल एमएससी आहेत आणि पंजाब विद्यापीठाच्या सर्व परीक्षांमध्ये प्रथम श्रेणीत प्रथम आणि रेकॉर्ड ब्रेकर राहिल्याबद्दल त्यांना चांसलर मेडल ऑफ एक्सलन्सने सन्मानित करण्यात आले. ते चर्चिल कॉलेज, केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंडमधून विकास अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर आहेत आणि जॉन एफ केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, हार्वर्ड विद्यापीठ, यूएसए येथून प्रशिक्षित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.