Assembly Election 2023: "आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे"; मोदींचा विजयाच्या भाषणात पहिल्याच वाक्यावर सिक्सर

देशातील चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकाचा निकाल आज जाहीर झाले, यात भाजपचा दणदणीत विजय झाला.
Assembly Election 2023: "आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे"; मोदींचा विजयाच्या भाषणात पहिल्याच वाक्यावर सिक्सर
Updated on

नवी दिल्ली : देशातील चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकाचा निकाल आज जाहीर झाले. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर तेलंगणात भाजप तिसऱ्या स्थानी राहिला.

या तीन राज्यातील दमदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात हजेरी लावली आणि जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाषणाला सुरुवात करताच पहिल्याच वाक्यात सिक्सर मारला. (Assembly Election 2023 Voice should reach Telangana PM Modi Sixer on first sentence of victory speech at new delhi BJP Headquarters)

भारत माता की जयच्या घोषणा अन्...

मोदी भाषणासाठी व्यासपीठावर येताच उपस्थितांमधून भारत माता की जय आणि मोदी मोदी अशा घोषणा सुरु होत्या. त्याचक्षणी मोदी म्हणाले की, भारत माता की जय हा आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे. (Marathi Tajya Batmya)

आजचा विजय ऐतिहासिक आणि अभुतपूर्व आहे. आज सबका साथ सबका विकासची भावना जिंकली आहे. आज विकसित भारताच्या आवाहनाचा विजय झाला आहे. आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय झाला आहे. आज वंचितांच्या विचाराचा विजय झाला आहे.

Assembly Election 2023: "आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे"; मोदींचा विजयाच्या भाषणात पहिल्याच वाक्यावर सिक्सर
Assembly Elections 2023: राहुल गांधींनी स्विकारला पराभव! म्हणाले, विचारधारेची लढाई...

तेलंगणात पाठिंबा वाढतोय

आज भारताच्या विकासासाठी राज्याचा विकास या विचाराचा विजय झाला आहे. आज इमानदारी, पारदर्शकता आणि सुशासनाचा विजय झाला आहे. मी सर्व मतदारांना आदरपूर्वक नमन करतो. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या लोकांनी भाजपवर भरपूर प्रेम केलं. तेलंगणात देखील भाजपचा पाठिंबा सातत्यानं वाढत आहे. (Latest Marathi News)

Assembly Election 2023: "आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे"; मोदींचा विजयाच्या भाषणात पहिल्याच वाक्यावर सिक्सर
Telangana Result 2023: तेलंगणात भाजप ठरली काँग्रेसची 'B' टीम? केसीआर यांना दाखवलं आस्मान

माझी जबाबदारी वाढली

हे आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे की जेव्हा आपल्या कुटुंबियांकडून इतकं प्रेम मिळतं, विश्वास मिळतो. त्यामुळं मी व्यक्तीगतरित्या हे अनुभवतो की यामुळं माझी जबाबदारी अधिक वाढते. आजही माझ्या मनात हाच भाव आहे. मी माझ्या माता-भगिनी, युवा साथींसमोर, शेतकरी भावा-बहिणींसमोर नतमस्तक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.