Chief Ministers: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदी नवे चेहरे दिसणार; भाजपच्या सुत्रांची माहिती

भाजप या राज्यांमध्ये कोणाला संधी देणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
Narendra modi and Amit Shah
Narendra modi and Amit ShahEsakal
Updated on

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपनं राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला. मुख्यंमत्रीपदाचा कुठलाही चेहरा न देता भाजपनं या निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळं आता या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सकता आहे.

पण विशेष बाब म्हणजे या तिन्ही राज्यांत मुख्यमंत्रीपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. (BJP to give responsibility of CM post to new faces in Rajasthan Madhya Pradesh and Chhattisgarh)

मुख्यमंत्रीपदी नव्या चेहऱ्यांना संधी

एएनआयनं भाजपच्या सुत्रांच्या हवाल्यानं ट्विट केलं आहे. यात म्हटलं की, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. पण हे चेहरे कोण असतील याबाबत मात्र कुठलीही माहिती समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

Narendra modi and Amit Shah
Veg Thali: सर्वसामान्यांना मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये व्हेज थाळी 10 टक्क्यांनी झाली महाग, काय आहे कारण?

भाजपची रणनिती काय?

माध्यमातील वृत्तानुसार, या तीन राज्यांमध्ये मुख्यंमत्री कोण व्हावेत याबाबत भाजपच्या थिंकटँकमध्ये मंथन सुरु आहे. लोकसभा निवडणूक २०२४ साठी पक्षाला फायदा होईल हा यामागचा हेतू आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी मंगळवारी चार तास याच विषयावर बैठक पार पडली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा देखील उपस्थित होते. (Marathi Tajya Batmya)

Narendra modi and Amit Shah
Jalgaon: पोटासाठी पाठीला फटके अन् चिमुरड्यांचे भविष्य धुसर; पोतराजांची कुटुंबे पश्चिम महाराष्ट्रातून खानदेशात

नवे चेहरे कोण असू शकतात?

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्याशिवाय प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य शिंदे, नरेंद्रसिंह तोमर आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या नावांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे. तसेच राजस्थानात वसुंधराराजे यांच्याशिवाय ओम बिर्ला, गजेंद्र शेखावत, अर्जुनराम मेघवाल, सीपी जोशी, दिया कुमारी आणि योगी बालकनाथ यांच्या नावाची चर्चा आहे. तर छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांच्याशिवाय अरुण कुमार राय, धर्मलाल कौशिक, माजी आयएएस अधिकारी ओपी चौधरी यांचं नाव चर्चेत आहेत.

ही नावं चर्चेत असली तरी अचानक याशिवाय कोणा इतर व्यक्तीचंच नावही जाहीर होऊ शकतं. कारण भाजपचं नेतृत्व अशा प्रकारे धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()