तेलंगणामधील निवडणुकीला जातीय रंग?(Telangana Assembly Election 2023)

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील चार राज्यांत मतदान झाले असून ३० नोव्हेंबर पासून तेलंगणा राज्यात ११९ जागांसाठी मतदान होणार आहे.
Telangana Election 2023
Telangana Election 2023esakal
Updated on

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील चार राज्यांत मतदान झाले असून ३० नोव्हेंबर पासून तेलंगणा राज्यात ११९ जागांसाठी मतदान होणार आहे. प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून २८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

तेलंगणा राज्याची स्थापन २०१४ साली झाली तेव्हापासून येथे भारत राष्ट्र समिती (BRS) (पूर्वीचे तेलगू राष्ट्र समिती ) पक्षाचे सरकार आहे. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने (Indian National Congress) भारत राष्ट्र समितीला जोरदार टक्कर दिली होती. मात्र २०१८ या वर्षात तुलनेने कमी जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले होते.

दरम्यान भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस या दोन पक्षांपासून तेलंगणामध्ये भाजप (BJP) खूप दूर आहे. त्यामुळेच यंदा मागासवर्गीय समाजाचा मुख्यमंत्री देणार असे सांगत भाजपने जातीय समीकरणे घातली आहे. त्यातून एकूणच या निवडणुकीला जातीय रंग चढल्याचे पाहायला मिळत आहे.

मतांचे विभाजन होऊ नये असे सांगत तामिळनाडू येथील सत्ताधारी पक्ष डीएमके (DMK) आणि 'वायएसआर काँग्रेस' पक्षाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यंदा काँग्रेसची ताकद वाढली असून तेलंगणामध्ये यंदा सत्तापालट होण्याची शक्यता अधिक आहे.

तेलंगणा विधानसभा माहिती एका दृष्टीक्षेपात

  • मतदार संघ ११९

  • मतदार संख्या ३ कोटी १७ लाख ३२ हजार ७२७

  • सध्या कोणत्या पक्षाचे सरकार? भारत राष्ट्र समिती

  • मुख्य लढत कोणामध्ये? भारत राष्ट्र समिती , काँग्रेस

  • मतदान कधी? ३० नोव्हेंबर २०२३

मागील निवडणुकीत कोणाला किती जागा?

  • भारत राष्ट्र समिती ८८

  • काँग्रेस १९

  • एमआयएम

  • तेलगू देसम पक्ष २

  • भाजप १

  • अन्य २

तेलंगणामध्ये मुख्य लढत कोणामध्ये

तेलंगणा राज्याची स्थापना जून २०१४ साली झाली. त्यानंतर त्या राज्यात दोन वेळा विधानसभा निवडणूका (Assembly Election ) झाल्या. या दोन्ही वेळी तेलंगणामध्ये केसी राव यांचे सरकार होते.

२०१४ साली झालेल्या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव (केसीआर) (KCR) यांच्या तेलगू राष्ट्र समिती यांना ६३ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेस पक्षाला २१ जागा मिळाल्या होत्या.

तर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलगू राष्ट्र समितीला ८८ जागा आणि काँग्रेस पक्षाला १९ जागा मिळाल्या. या दोन्हीही निवडणुकीत भाजप या राष्ट्रीय पक्षाचा कुठेच बोलबाला नव्हता. या दोन्ही निवडणुकीत भाजपाला २०१४ साली ५ तर २०१८ साली एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

यामध्ये दोन्हीही वर्षी एमआयएम पक्षाला ७ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या राज्यात मुख्य लढत ही काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती (पूर्वीची तेलगू राष्ट्र समिती ) यांच्यामध्येच आहे हे स्पष्ट आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?

  • महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देणार

  • ५०० रुपयांमध्ये गॅस सिलेंडर (Gas Cylinder) आणि २०० युनिटपर्यंत वीज मोफत (Free electricity)

  • रायतू भरोसा या योजनेतंर्गत शेतकऱ्यांसाठी १५ हजारांची गुंतवणूक तर शेतकरी मजुरांसाठी १२ हजार रुपये

  • ज्यांना स्वतःचं घर नाही अश्यांना 'इंदिरम्मा इंदू गॅरंटी' या योजनेअंतर्गत घर आणि पाच लाख रुपये दिले जाणार

  • विद्यार्थ्यांना ५ लाख रुपयांचे विद्या भरोसा कार्ड देणार

  • ४ हजार रुपये महिना पेन्शन आणि १० लाख रुपयांचा राजीव आरोग्यश्री विमा मिळणार

भारतीय राष्ट्र समितीच्या जाहीरनाम्यात काय?

  • ९३ लाख आर्थिक मागासांना पाच लाखाचा जीवन विमा

  • पाच हजार रुपये महिना सामाजिक पेन्शन

  • रायतू बंधू योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर प्रतिवर्षी १० जाहीर दिले जातात ते हळूहळू १६ हजार करण्यात येतील

  • पात्र लाभार्थ्यांना ४०० रुपयांना गॅस सिलेंडर देणार

  • आरोग्य श्री स्वास्थ योजनेंतर्गत १५ लाखपर्यंतचा विमा देण्याचे वचन

  • दिव्यांग व्यक्तींना मिळणारी पेंशन ४ हजारांहून ६ हजार करणार

Telangana Election 2023
MP Assembly Election: चर्चा एकच... सरकार कोणाचं! अटीतटीमुळे कोणालाही अंदाज येईना...

बीआरएस कोणत्या राष्ट्रीय पक्षाची 'टीम बी' ?

याबाबत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. यामध्ये काँग्रेसचे राहुल गांधी प्रचारादरम्यान म्हणाले की, "बीआरएस हे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपला मदत करते आणि भाजप विधानसभेच्या निवणुकीवेळी बीआरएस ला मदत करते.

काँग्रेसच्या नेत्यांवर ईडी कारवाई होते पण बीआरएसच्या एकही नेत्यावर ईडी (ED) ची कारवाई होत नाही." तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप केला की, या दोन्ही पक्षांनी मिळून मद्य घोटाळा केला आहे. तसेच या दोन्ही पक्षांनी मिळून संपूर्ण तेलंगण राज्य नष्ट केले आहे.

त्यामुळे आता बीआरएस ही नक्की कोणाची टीम बी (Team B) आहे हे सत्ता स्थापनेच्या वेळीच समोर येऊ शकेल.

काँग्रेसची ताकद वाढल्याने सत्तापालट होणार?

तामिळनाडू येथील सत्ताधारी पक्ष डीएमके (Dravida Munnetra Kazhagam) आणि 'वायएसआर काँग्रेस' पक्षाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही पक्षांनी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.

तसेच काही मुस्लिम संघटनांनी देखील काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामळे अर्थातच काँग्रेसची ताकद वाढली आहे.

काँग्रेसला भारत जोडो यात्रेनंतर मिळालेला वाढता प्रतिसाद, इंडिया आघाडी (India) आणि भाजपविरोधी ठाम वैचारिक भूमिका घेतल्याचा फायदा यामुळे यंदा तेलंगणामध्ये यंदा सत्तापालट होण्याची शक्यता अधिक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Telangana Election 2023
Telangana Election : तेलंगणामध्ये काँग्रेसचा 'एम फॅक्टर', 119 पैकी 46 जागांवर होणार थेट फायदा

तेलंगणामध्ये जातीय समीकरणे अधिक गडद

तेलंगणा राज्यात ओबीसी आणि मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात आहे. तसेच मुस्लिम समाजाची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी भाजपने हैद्राबाद येथे मागासवर्गीय समाजाची आत्मगौरव सभा घेतली होती.

तसेच भाजपच्या हाती सत्ता दिल्यास मागासवर्गीय समाजाचा मुख्यमंत्री दिला जाईल असे आश्वासन देखील भाजपने दिले आहे. त्याचबरोबर अमित शहा (Amit Shah) आपल्या प्रचादरम्यान म्हणाले आहेत की, मुस्लिमांचे आरक्षण काढून एससी आणि एसटी प्रवर्गांना ते वाटून दिले जाईल.

तर केसीआर यांची प्रचारादरम्यान अशी घोषणा केली आहे की, अल्पसंख्यांक समाजासाठी स्वतंत्र आयटी पार्क उभारण्यात येईल.

काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्तरावरच ओबीसी समाजाच्या जनगणनेबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास पंचायत राजमध्ये इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण २३ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात येईल.

Telangana Election 2023
Telangana Election : तेलंगणमध्ये मोदींच्या आज दोन सभा; तिरुपती बालाजी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद

तेलंगणाच्या निवडणुकीत 'इंदिराअम्मा' चा मुद्दा का गाजला?

काँग्रेसच्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) ज्यावेळी प्रचारासाठी गावोगावी फिरत होत्या त्यावेळी अनेकांनी त्यांना 'इंदिरा अम्मा' अशी हाक मारली.

इंदिरा गांधी (Indira Gandhi) ज्यावेळी आणीबाणीनंतर रायबरेलीमधून निवडणूक हारल्या होत्या त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी मेडकसह अन्य दोन जागांवरून लोकसभेची निवडणूक लढली होती. ते मेडक सध्या तेलंगणा येथे आहे. त्यावेळी त्या २ लाख ९५ हजाराच्या फरकाने निवडून आल्या होत्या.

तेथील आदिवासी नागरिक सांगतात की, इंदिरा अम्माने आम्हाला आमच्या जमिनी परत मिळवून दिल्या होत्या. यावर तुम्ही मला इंदिरा अम्मा (Indiramma) म्हणालात त्यामुळे माझी जबाबदारी वाढली असल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले.

इंदिरा गांधी यांचा काळ पुन्हा आणण्याचे आश्वासन दिले जात आहे. पण इंदिरा गांधी यांच्या काळात लोक भुकेने गेले, नक्षलवाद फोफावला, बनावट चकमकी झाल्या. तो काळ तुम्हाला पुन्हा हवा आहे का असा प्रश्न केसीआर यांनी जाहीर व्यासपीठावरून उपस्थित केला.

बीआरएस महाराष्ट्रातही निवडणूक लढविण्याच्या तयारीत?

तेलंगणाच्या सीमेला लागूनच महाराष्ट्र राज्य (Maharashtra state) आहे. महाराष्ट्रातील अनेक सीमावर्ती भागातील लोक हे तेलगू भाषा बोलतात. त्यामुळेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी बीआरएस या भागात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आपला पक्षाचा विस्तार अन्य राज्यात करण्याच्या दृष्टिकोनातून तेलगू राष्ट्र समिती हे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले आहे. सीमावर्ती भागातील अनेक शेतकऱ्यांनाही मिळणाऱ्या अनेक सुविधांमुळे या पक्षाकडे अधिक कल दिसून येतो आहे.

Telangana Election 2023
Telangana Election : केसीआर यांनी हैदराबादमधून कोट्यवधी रुपये लुटल्याचा आरोप; राहुल गांधी थेटच बोलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.