Assembly Election Results 2023 : पराभूत राज्यांमध्ये काँग्रेस घेणार मोठा निर्णय; राजस्थानमध्ये गहलोतांचा पत्ता कट?

congress sonia gandhi rahul gandhi
congress sonia gandhi rahul gandhiesakal
Updated on

नवी दिल्लीः राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर त्यांचे राजकीय परिणाम लवकरच दिसणार आहेत. या तीनही राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या तीनही राज्यांमध्ये काँग्रेसला एकही राज्य कायम ठेवता आले नाही. यातील दोन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. या राज्यांमधील पराभवांची कारणमीमांसा करण्यात येत असून पक्षांची सूत्रे आता नव्या पिढीकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे समजते.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निष्ठावंत गोविंदसिंह डोटासरा, मध्य प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ तर छत्तीसगडमध्ये दीपक बैज प्रदेशाध्यक्ष आहेत. या नेत्यांना पक्षाचा आलेख उंचावता आलेला नाही. यापैकी कमलनाथ यांच्याबद्दलचा असंतोष निकालानंतर स्पष्टपणे दिसून आला आहे. कमलनाथ यांच्या एककल्ली स्वभावामुळे व अहंकारामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

congress sonia gandhi rahul gandhi
Bullet Train : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन टर्मिनलचा व्हिडीओ रिलीज; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला नेत्रदीपक Video

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता पुन्हा येईल, अशी आशा होती. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये सुद्धा काँग्रेसला वरचढ दाखविले होते. परंतु प्रत्यक्षात काँग्रेसला केवळ ६६ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. या पराभवाला कमलनाथ यांची कार्यशैली जबाबदार असल्याने त्यांची गच्छंती निश्चित असल्याचे मानले जाते. त्यांच्या जागा ओबीसी समाजातील व्यक्तीची निवड होण्याची शक्यता आहे. भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान ओबीसी चेहरा असल्यामुळे नाराजी असतानाही त्यांना यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

congress sonia gandhi rahul gandhi
Ethanol Production: उसापासून इथेनॉल बनवण्यावर सरकारने घातली बंदी; काय आहे कारण?

गहलोत निष्ठावंतांचा पत्ता कट

मावळते मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा एकछत्री अंमल आता मात्र समाप्त होण्याची शक्यता आहे. या एकछत्री कारभारामुळे सचिन पायलट यांना दूर केल्याने गुर्जर समाज नाराज झाल्याचे दिसून आले आहे. गुर्जर पट्ट्यात काँग्रेसला जबर नुकसान झाले आहे. आता बदललेल्या स्थितीमध्ये पायलट गटाला अधिक संधी मिळण्याची शक्यता आहे.

छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याबद्दल व तसेच उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांच्यातील संघर्षामुळे पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागले. प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांना छत्तीसगडमध्ये प्रभाव टाकता आला नाही. मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार व मुख्यमंत्री हेच पक्षाच्या संघटनेमध्ये अधिक प्रभावी होते, असा काँग्रेस श्रेष्ठींचा कयास आहे.

यामुळे काँग्रेस संघटन हे त्यांच्या कलाने चालल्याने काँग्रेसला नुकसान सहन करावे लागल्याचा आता दावा केला जात आहे. यामुळे या तिन्ही राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलून नव्या तरुण रक्ताला संधी देण्याचे ठरविण्यात आले आहे. राहुल गांधी शुक्रवारपासून परदेश दौऱ्यावर आहेत. ते परत आल्यानंतर या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.