पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूक जोरदार चर्चेत आली आहे. शिवाय कसबा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र यावेळी कसब्यामध्ये चुरस आहे.
कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे. रवींद्र धंगेकर प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धंगेकर यांनी आज मनसे कार्यालयात भेट दिली.
या भेटीनंतर भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन कसब्यातील मनसे नेत्याला आला आहे. संजय काकडेंमार्फत फडणवीसांची दीपक पायगुडेंसोबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीवर फडणवीस लक्ष ठेवून आहेत.
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट आजारपणातही मैदानात उतरले आहे. गिरीश बापट यांनी अनेक वर्षे या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
त्यामुळे त्यांचा शब्द कसब्यात महत्त्वपूर्ण ठरतो. शिवाय भाजपने ब्राह्मणेत्तर उमेदावर दिल्याने मतदार वेगळा निर्णय घेतील, याची शक्यता होती. त्यामुळे आज हेमंत रासनेचा प्रचार करण्यासाठी खुद्द बापट समोर आले.
TV9 मराठीच्या वृत्तानुसार...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.