‘फायनान्सिअल मॅनेजमेंट’ संधींचे आगार

 Financial Management
Financial Managementsakal
Updated on

देशाच्या विकासात फायनान्स अर्थात वित्तिय क्षेत्र मोठी भूमिका बजावत आहे. अनेक नामवंत कंपन्यांनी त्यात आपले पाय रोवले आहेत. एकेकाळी काही मोजक्या कंपन्या त्यामध्ये असताना, आता हजारोंच्या संख्येने विविध संस्थाही त्यात सहभागी झाल्या आहे. त्यामुळे तरुण होतकरू युवकांना त्यामध्ये करिअरची मोठी संधी आहे. यासाठीच एमबीए सारख्या अभ्यासक्रमात ‘फायनान्सिअल मॅनेजमेंट’ या स्पेशलायझेशनला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

एम.बी.ए.च्या सध्याच्या अभ्यासक्रमाच्या रचनेनुसार, द्वितीय वर्षांमध्ये स्पेशलायझेशनची निवड करायची असते. काही विद्यापीठांमधून एक स्पेशलायझेशन तर काही विद्यापीठांमधून दोन स्पेशलायझेशनचे विषय घेता येतात. स्पेशलायझेशनच्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये ‘वित्तीय व्यवस्थापन’ हा एक पर्याय उपलब्ध आहे. वित्तीय व्यवस्थापन किंवा फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो व तसेच यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. वित्तीय व्यवस्थापनाची प्रमुख कार्ये म्हणजे सेवा क्षेत्र व उत्पादन क्षेत्र यामधील कंपन्यांना तसेच इतर व्यावसायिक संस्थांना लागणाऱ्या भांडवलांची गरज ठरवणे आणि त्याप्रमाणे विविध मार्गानी, आवश्यक ते भांडवल योग्य त्या ठिकाणी गुंतवणे, ज्यामुळे संस्थांना अधिकाधिक लाभ मिळेल याबाबत माहिती उपलब्ध आहे. मात्र, ही संधी आत्मसात करण्यासाठी कौशल्य विकासाची जोड मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विविध कंपन्यांच्या माध्यमातून ऑनलाइन सर्टीफिकेशन कोर्सेस उपलब्ध आहेत.

आवश्‍यक कौशल्ये

  • आकडेवारीची माहिती

  • तपशीलांकडे लक्ष देणे

  • अमूर्त गोष्टी समजून घेण्याची क्षमता

  • अकाउंटिंग, अर्थशास्त्र, बँकिंग ऑपरेशन्स, मार्केटचे ज्ञान

वित्तीय क्षेत्र

  • बँकिंग,

  • नॉन-बँकिंग वित्तीय संस्था

  • म्युच्युअल फंड

  • विमा क्षेत्र

  • ऑपरेशन्स

  • सामान्य व्यवस्थापन

कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था

कार्पोरेट फायनान्स इन्स्टिट्यूट, कॅपिटल आयक्यू, एनपीटीईएल आणि स्वयंम पोर्टल, एनआयएसएम, अपग्रेड, अनडेमी, कोर्सेरा

येथे मिळेल संधी

केपीएमजी, फेडरल बँक, आयसीआयसीआय, चोलामंडलम, एचडीएफसी, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, मॅग्नम विमा, एस ॲण्ड पी ग्लोबल, मायक्रोफायनान्स कंपन्या, अपस्टॉक्स,आनंद राठी, बुल्स एसेट, विमा क्षेत्र

''गेल्या काही दशकात ‘फायन्शिअल मॅनेजमेंट’ मोठ्या संधी आहे. त्यामुळे ती संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. त्यातून विद्यार्थ्यांना या संधीचे सोने करता येणे शक्य होईल.''

- डॉ. कुणाल पारेख, असिस्टंट प्रोफेसर, सीआयबीएमआरडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.