पाच राज्यांमधील निवडणूक; ११ मुद्द्यांमधून समजून घ्या निकालाचा अर्थ

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष छोबीपछाड झाला आहे.
Five State Assembly Election 2022
Five State Assembly Election 2022Sakal
Updated on

विनोद राऊत

Five State Assembly Election Result : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष छोबीपछाड होताना दिसून येत आहे. तर युपीमध्ये मोदी-योगींचे डबल इंजिन मोठा विजय मिळवताना दिसत आहे. मतमोजणीच्या हाती आलेल्या अंदाजांनुसार भाजपला युपीमध्ये 250 हून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे युपीमध्ये भाजपला मिळत असलेल्या जागांनुसार 2024 मध्ये सत्तेत परतण्याचा भाजपचा मार्ग जवळपास मोकळा झाला असून, भविष्यात योगी हे मोदींचे उत्तराधिकारी होऊ शकतात अशी शक्यात वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालांवरून पाच राज्यातील निकालाचा अर्थ नेमका काय हे जाणूून घ्या. (Five State Assembly Elections Result)

Five State Assembly Election 2022
विश्लेषण : गोव्यातील विजयामुळे फडणवीसांचं भाजपातील वजन वाढणार
  • नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालांमध्ये युपी जिंकल्यामुळे 2024 मध्ये सत्तेत परतण्याचा भाजपचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. एवढचे नव्हे तर, भविष्यात योगी हे मोदींचे उत्तराधिकारी होऊ शकतात.

  • शेतकरी आंदोलनाचा कुठलाही फटका भाजपला बसला नाही.

  • आपची राष्ट्रीय पक्ष होण्याकडे वाटचाल, एक प्रबळ विरोधी चेहरा होण्याकडे 'आप' ने वाटचाल सुरु केलीये.

  • निवडणुकांमध्ये आलेल्या निकालांनुसार बसपा आपले अस्तिस्त्व गमावत असून, देशातील एक मजबूत दलित चळवळ अस्तंगत होतेय.

  • काँग्रेस पक्ष अधिकाधिक कमजोर होतोय, हायकमांडचे अनेक निर्णय पक्षाच्या पीछेहाटीला जबाबदार आहे.

Five State Assembly Election 2022
पंजाबमध्ये 'आप आये बहार आई' गाणं वाजण्यामागची पाच कारणं...
  • देशातील मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस वेगाने आपले अस्तित्व गमावत चाललाय.

  • बेरोजगारी,विकास हे निवडणूक मुद्दे म्हणून हद्दपार, यूपीतील कायदा, सुव्यवस्था आणि कोविडमधील योगी सरकारची सुमार कामगिरी कुठलाच प्रभाव पाडू शकली नाही.

  • मायावती, प्रियांका, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावावर व्यापक प्रश्नचिन्ह उभे झालेत

  • निकालामुळे विरोधी पक्षाला कॉन्फिडन्स आणि एकजूट टिकवणे कठीण.

  • महाराष्ट्रात भाजप मविआ सरकार पाडण्यासाठी अधिक वेगाने हालचाली सुरु करेल.

  • अमरिंदर सिंग,सिद्धू, चन्नी आणि प्रकाश सिंग बादल या पंजाबच्या बड्या नेत्यांचा पराभव स्प्ष्ट करतो की, पंजाबच्या जनतेने परंपरागत नेत्यांना बाजूला सारले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()