Telangana Election : ''सरकार आल्यास राम मंदिराचे मोफत दर्शन'', शाह यांचे तेलंगणवासीयांना आश्‍वासन

Amit Shah
Amit Shah eSakal
Updated on

हैदराबाद: मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर आता राजकीय पक्षाचे लक्ष तेलंगण आणि राजस्थानकडे लागले आहे. तेलंगणात भाजपने निवडणूक प्रचाराला वेग दिला आहे. भाजपला मत दिल्यास राज्यातील जनतेला अयोध्येत राम मंदिराचे मोफत दर्शन घडवू, असे आश्‍वासन आज गृहमंत्री अमित शहा यांनी दिले.

तेलंगणच्या गडवाल येथे आयोजित सभेत अमित शहा यांनी काँग्रेसवर प्रखर टीका केली. ते म्हणाले, ‘‘ गेल्या सात दशकांपासून राम मंदिराचे काम रेंगाळले होते. काँग्रेसने या कामात आडकाठी आणली होती. भाजपने सतत राम मंदिराच्या मुद्यावर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भूमिपूजन केले आणि येत्या २२ जानेवारीला त्याची प्राणप्रतिष्ठा होत आहे. तेलंगणातील जनतेने भाजपला मतदान आणि सरकार सत्तेवर आणावे. भाजपचे सरकार राज्यातील सर्व जनतेला अयोध्येतील राम मंदिराचे मोफत दर्शन करण्याची व्यवस्था करेल’’

Amit Shah
MP Assambly Election: सवाई माधोपूरची जागा जिंकण्यासाठी सर्वचं लागले कामाला; 'जात' ठरणार प्रभावी

शहा यांनी बीआरएस सरकारवर टीका केली. ते म्हणाले, त्यांनी धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण दिले आणि ते बेकायदा आहे. तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास धार्मिक आधारावर दिलेले आरक्षण रद्दबातल केले जाईल. तसेच ओबीसी आणि अनुसूचित जातीचा कोटा वाढविण्यात येईल. कॉंग्रेस आणि बीआरएस हे दोन्ही पक्ष मागासवर्गियांच्या विरोधात काम करत आहेत. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशातील मागासवर्गीयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात भाजपचे सरकार आले तर तेलंगणचा मुख्यमंत्री हा मागास वर्गातील असेल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील जनतेला खोटी आश्‍वासने दिली आहेत. त्यांनी खोटे बोलण्याचा विक्रम केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही तेलंगणचे भवितव्य ठरविणारी असेल. तेलंगणच्या जनतेसाठी डबल इंजिनचे सरकार असण्याची गरज आहे. राज्यातील बीआरएसला ‘व्हिआरएस’ देण्याची वेळ आली आहे. केसीआर यांनी शेतकऱ्यांना कोणताही अधिकार दिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Amit Shah
"सरकारकडून सगळ्याचं भगवेकरण"; टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीच्या रंगावर ममता बॅनर्जी संतापल्या, भाजपचं उत्तर

बीआरएसचे स्टेअरिंग ओवेसींकडे

खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आणि बीआरएस यांच्यात आघाडी आहे. यावर बोलताना अमित शहा म्हणाले, बीआरएसच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह मोटार आहे. मात्र त्याचे स्टेअरिंग ओवेसी यांच्याकडे आहे. कॉंग्रेस, बीआरएस आणि मजलिस हे टूजी, थ्री जी आणि फोरजी पक्ष आहेत. केसीआर आणि कॉंग्रेसने मागासवर्गीयातील नेत्यांना तिकीट देण्यास टाळाटाळ केली आणि अन्याय केला, असा आरेाप शहा यांनी केला. केसीआर हे हैदराबाद मुक्ती दिन कार्यक्रमात सहभागी होण्यास टाळाटाळ करतात. भाजपचे सरकार आल्यास राज्यात अडीच लाख सरकारी जागांवर भरती केली जाईल, असे आश्‍वासनही शहा यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.