झारखंड विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. यापूर्वी झारखंडमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून हलचालींना वेग आला आहे. राजकीय घडामोडींदरम्यान झारखंड काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मानस सिन्हा यांनी पदाचा राजीनामा दिली असून सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश देखील केला आहे. त्यांना झारखंड भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र के यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश दिला.