‘‘झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाप्रणीत (जेएमएम) आघाडी सरकार हे फुसक्या फटाक्यांसारखे आहे तर भाजपचे सरकार हे रॉकेटप्रमाणे झारखंडला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल,’’ असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केला. रांची येथील हटिया येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.