कम्युनिस्ट पक्षाची मोठी खेळी; नसीरुद्दीन शाहांच्या भाचीला दिली उमेदवारी

Naseeruddin Shah Saira Halim
Naseeruddin Shah Saira Halimesakal
Updated on
Summary

सायरा आणि सुप्रियो निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं बालीगंजमधील लढत हायप्रोफाइल बनलीय.

भारतीय कम्युनिस्ट पक्षानं (मार्क्सवादी) ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची भाची सायरा हलीम (Saira Halim) यांना बालीगंज पोटनिवडणुकीसाठी (Ballygunge Election) उमेदवारी दिलीय. डाव्यांनी बुधवारी ही घोषणा केलीय. सायरा यांचा सामना तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्याशी होणार आहे. सायरा ह्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (NRC) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) विरोधात निदर्शनं करत आहेत. बालीगंज विधानसभेसाठी 12 एप्रिलला निवडणूक होणार आहे.

Naseeruddin Shah Saira Halim
राजकारण तापलं! पराभवानंतर अकाली दलात फूट

सायरा आणि सुप्रियो निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं बालीगंजमधील लढत हायप्रोफाइल बनलीय. मात्र, भारतीय जनता पक्षानं (BJP) बुधवारी दुपारपर्यंत उमेदवाराचं नाव जाहीर केलं नव्हतं. मंत्री आणि दिग्गज नेते सुब्रत मुखर्जी यांच्या निधनानंतर दक्षिण कोलकातामधील ही जागा रिक्त झाली होती. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीनं (TMC) राज्यात 294 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपच्या खात्यात 77 जागा आल्या आहेत.

Naseeruddin Shah Saira Halim
राजकारणात उलथापालथ! शरद यादवांचा LJD लालू यादवांच्या पक्षात विलीन होणार

लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह यांची मुलगी सायरा यांचे पती डॉ. फुआद हलीम हे देखील सीपीआय (एम) नेते आहेत. ते गरीबांसाठी आरोग्य शिबिरं चालवण्याकरिता ओळखले जातात. डॉ. फुआद हलीम हे विधानसभेचे माजी अध्यक्ष हसीम अब्दुल हलीम यांचा मुलगा आहे. दरम्यान, केवळ बालीगंज नाही तर आसनसोल लोकसभा मतदारसंघातही (Lok Sabha Constituency) हायप्रोफाईल लढत पहायला मिळणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी (Mamata Banerjee) भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Actor Shatrughan Sinha) यांना उमेदवारी दिलीय. भाजपसाठी दोन वेळा विजयी झालेल्या सुप्रियो यांनी पक्ष सोडल्यानं ही जागा रिक्त झाली होती. याशिवाय माकपनं बुधवारी आसनसोलमधून पार्थ मुखर्जी यांना उमेदवारी दिलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()