Pune By-Election News: भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी सोमवारी सकाळी पिंपळे गुरव येथील त्यांच्या निवासस्थानापासून पदयात्रेद्वारे शक्ती प्रदर्शन करत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी प्रचंड संख्येने जनसमुदाय त्यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाला होता. अर्ज भरताना त्यांच्यासमवेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, शंकर जगताप आदी उपस्थित होते.
मात्र चिंचवडमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मात्र मोठी गोष्ट म्हणजे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी चिंचवड विधानसभा लढवणार यावर आहे मात्र. राष्ट्रवादीकडून अजून पर्यत कोणालाही उमेदवारी देण्यात आली नाही.
मात्र इच्छुक असलेल्या मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.