MP Election Result 2023 : काँग्रेसला 'ऑपरेशन लोटस'ची भीती? विजयी उमेदवारांना दिल्या महत्वाच्या सूचना

मध्य प्रदेशात कोण सत्ता स्थापना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
madhya pradesh assembly election 2023
madhya pradesh assembly election 2023Esakal
Updated on

Madhya Pradesh Assembly Election 2023 :

देशातील चार राज्य छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यादरम्यान मध्य प्रदेशात आमदारांचा घोडाबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसला ऑपरेशन लोटसची भीती?

विधानसभा निवडणूकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर अपक्ष आमदारांना आपल्या गटात घेण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक २०२३ चा निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना तातडीनं भोपाळला येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजपकडून अपक्ष आणि अन्य पक्षाच्या उमेदवारांशी संपर्क साधला जात असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे ऑपरेशन लोटसचा धोका टाळण्यासाठी काँग्रेस काळजी घेताना दिसत असून निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अलर्ट मोडवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.

madhya pradesh assembly election 2023
MP Elections 2023 : मध्य प्रदेशात अपक्ष ठरणार 'किंगमेकर्स'? निकालापूर्वी काँग्रेस-भाजपच्या गोटात हालचालींना वेग

मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांवर निवडणूक पार पडली आहे, यापैकी राज्यात बहुमत मिळवण्यासाठी तब्बल ११६ जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. आज होत असलेल्या मतमोजणीदरम्यान कोणता पक्ष विजय मिळवतो याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

madhya pradesh assembly election 2023
MP Assembly Election: मध्य प्रदेशातील 'या' 6 नेत्यांवर देशाचं लक्ष, 'मामा' गड जिंकणार की काँग्रेसला बहुमत मिळणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.