मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल हाती; दिवसभरात कशी होती राजकीय रस्सीखेच वाचा एका क्लिकवर

Madhya Pradesh Assembly Election 2023 Results - मध्य प्रदेशात 230 जागांवर झालेल्या विधानसभा निवडणूक 2023चा आज निकाल जाहीर केला जाणार आहे.
Madhya Pradesh Assembly Election 2023 Results LIVE
Madhya Pradesh Assembly Election 2023 Results LIVE
Updated on

मध्य प्रदेशचे सर्व निकाल आता जाहीर; १६३ जागांसह भाजपा विजयी 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल आता हाती आले आहेत. यामध्ये १६३ जागांसह भाजप विजयी झाला आहे. भाजपनं ११५ जागांचा बहुमताचा आकडा कधीच पार केला, त्यामुळं त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी असून त्यांना केवळ ६६ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तसेच भारत आदिवासी पार्टीला एका जागेवर विजय मिळाला आहे.

भाजपचा १६० जागांवर तर काँग्रेसचा ६४ जागांवर विजय 

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा १६० जागांवर विजय झाला असून काँग्रेसचा ६४ जागांवर विजय झाला आहे. तर ३ जागांवर भाजप आघाडीवर आहे तर काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

भाजपचा १४६ जागांवर विजय, काँग्रेसच्या वाट्याला ४९ जागा

मध्य प्रदेशात १४६ जागांवर भाजपनं विजय मिळवला असून काँग्रेसच्या वाट्याला ४९ जागा आल्या आहेत. तर एक जागा भारत आदिवासी पार्टीनं जिंकली. तसेच भाजप १८ जागांवर तर १६ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.

तीन राज्यातील विजयानंतर PM मोदी भाजप मुख्यालयात दाखल 

मध्य प्रदेशात भाजप 82 तर काँग्रेसचा 20 जागांवर विजय

मध्य प्रदेशमध्ये भाजप 82 तर काँग्रेसचा 20 जागांवर विजय झाला आहे. तर भारत आदिवासी पार्टीला 1 जागा मिळाली आहे. त्याचबरोबर ८१ जागांवर भाजप आघाडीवर असून काँग्रेस ४६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं भाजप सध्या १६३ तर काँग्रेस ६६ जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ही आकडेवारी दिली आहे.

MP Election Results 2023 :  मध्य प्रदेशात काँग्रेसचा १३ जागांवर विजय 

मध्य प्रदेशात काँग्रेसचा १३ जागांवर विजय झाला आहे. शेवपूर(१), विजयपूर (२), मोरेना(६), जबलपूर पुरबा (९७), बिछीया (१०५), निवास (१०६), केओलारी (११६), अमरवाडा (१२३), पनधुरणा (१२८), बडवाणी (१९०), जोबत (१९२), तारणा(२१४), पुष्परगंज (८८) या जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपला ४९ जागांवर विजय मिळाला आहे. तर भारतीय आदिवासी पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे.

MP Election Results 2023 :  मध्य प्रदेशचे कृषी मंत्री ८७० मतांनी पराभूत

मध्य प्रदेशात भाजप आघाडीवर आहे, मात्र मध्य प्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल यांचा ८७० मतांनी पराभव झाला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते  कैलाश विजयवर्गीय 51977 मतांनी आघाडीवर

भाजपचे कैलाश विजयवर्गीय 51977 मतांनी आघाडीवर आहेत.

इंदूर - 13वी फेरी

विधानसभा- 01

भाजप उमेदवार

कैलाश विजयवर्गीय - 110592

काँग्रेसचे उमेदवार

संजय शुक्ला-58665

MP Election Results 2023 : शिवराज सिंह चौहन यांच्या फोटोला कार्यकर्त्यांकडून दुधाचा अभिषेक

मध्य प्रदेशात भाजप 162 जागांवर आघाडीवर आहे. यादरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भगवान हनुमानाच्या आवतारातील पोस्टरवर भाजप कार्यकर्त्यांकडून दूधाचा अभिषेक घाण्यात आला. राज्यात पक्ष मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे, या पार्श्वभूमिवर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे.

MP Election Results 2023 :  मध्य प्रदेशात भाजप 162 जागांवर आघाडीवर

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकांचे निकाल आता स्पष्ट होताना दिसत आहेत. भाजप 162 जागांनी आघाडीवर असून यादरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, अश्विनी वैष्णव, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रदेश भाजप अध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी भोपाळमध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांना श्रद्धांजली वाहिली.

राधाबाईंनी गुलाबाचं फुल देऊन शिवराजसिंह चौहानांचं केलं स्वागत

मध्य प्रदेशातील भाजपचं सरकार येणार हे आता जवळपास स्पष्ट झाल्यानं तिथं सगळीकडं जल्लोषाचं वातावरण आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असलेल्या स्टाफमधील एक महिला राधाबाई यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पुष्प देऊन त्यांचं अभिनंदन केलं आहन.

भाजपला निवडणूकीतल घवघवीत यश; चंद्रशेखर बावनकुळेंचा नागपुरात ढोल वाजवत जल्लोष

नागपूर : भाजपला निवडणूक निकालात मिळालेल्या यशाचा जल्लोष करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत धंतोली परिसरातील भाजपच्या विभागीय कार्यालयात ढोल तशा वाजवत जल्लोष करण्यात आला.

भाजपच्या आघाडीनंतर शिवराज सिंह चौहान यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी 

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला. तसेच चौहान यांनी त्यांच्या कुटुंबासह भोपाळमध्ये पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांना अभिवादन केलं.

MP Election Results 2023 : काँग्रेसला 230 पैकी 66 जागांवर आघाडी, पण 12 जागांवर हजारहून कमी मतांनी आघाडी

MP Election Results 2023 In Marathi : मध्य प्रदेशात काँग्रेस पक्ष 230 पैकी केवळ 66 जागांवर आघाडीवर आहे. त्यापैकी 12 जागा अशा आहेत जिथे ही आघाडी 1000 मतांपेक्षा कमी आहे. तर सात जागांवर 500 पेक्षा कमी मतांची आघाडी आहे.

- जौरामध्ये 962 मतांची आघाडी

- गोहदमध्ये 272 मतांची आघाडी

- ग्वाल्हेर ग्रामीणमध्ये 239 मतांची आघाडी

- मानपूरमध्ये 63 मतांची आघाडी

- जबलपूर उत्तरमध्ये 776 मतांची आघाडी

- बरघाटमध्ये 308 मतांची आघाडी

- जुन्नरदेव मध्ये 232 मतांची आघाडी .

- चौरईत 317 मतांनी आघाडी

- सेंधवामध्ये 735 मतांनी आघाडी

- थांदलामध्ये 769 मतांनी आघाडी

- पेटलावाडमध्ये 119 मतांनी आघाडी

- जावदमध्ये 910 मतांनी आघाडी.

MP Election Results 2023 : मध्य प्रदेशात 11 जागांवर भाजप उमेदवाराला 1000 पेक्षा कमी मतांची आघाडी

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या निकालामध्ये भाजप 161 जागांवर आघाडीवर आहे. मात्र यापैकी 11 जागांवर भाजप उमेदवाराला 1000 पेक्षा कमी मतांची आघाडी आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठ्या आघाडीसह विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. मात्र, 11 जागांवर भाजपचे उमेदवार एक हजारापेक्षा कमी मतांनी आघाडीवर आहेत. चार जागा अशा आहेत जिथे भाजपच्या उमेदवाराला 500 पेक्षा कमी मतांची आघाडी आहे.

- डबरामध्ये 839 मतांची आघाडी

- टिकमगडमध्ये 150 मतांची आघाडी

- पुष्पराजगडमध्ये 706 मतांची आघाडी

- बैहरमध्ये 524 मतांची आघाडी

- आमलामध्ये 758 मतांची आघाडी

- घोडडोंगरीमध्ये 739 मतांची आघाडी -

भोपाळ उत्तरमध्ये 205 मतांची आघाडी

- कालापीपलमध्ये 152 मतांची आघाडी

- महेश्वरमध्ये 173 मतांची आघाडी

- देपालपूरमध्ये 763 मतांची आघाडी

- नागदा खाचरोडमध्ये 821 मतांची आघाडी.

MP Election Results 2023 : शिवराज सिंह चौहान यांची मोठी आघाडी; तीन फेऱ्यांनंतर 21 हजार मतांनी आघाडीवर

MP Election Results 2023 : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधनी विधानसभा मतदारसंघात आपली आघाडी कायम ठेवली आहे. बुधनी जागेवर मतमोजणीच्या तीन फेऱ्या पार पडल्या असून शिवराज सिंह चौहान यांना आतापर्यंत 36,267 मते मिळाली असून त्यांच्याकडे 21,197 मतांची आघाडी आहे. येथे काँग्रेसचे विक्रम मस्ताल दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना 7,165 मते मिळाली आहेत. या जागेवर समाजवादी पक्षाचे मिर्ची बाबा अपक्षांच्या मागे आहेत.

MP Election Results 2023 :  मी सांगितलं होतं भाजपला आरामात बहुमत मिळेल - शिवराज सिंह चौहान

MP Election Results 2023 :  मी सांगितले होते की भाजपला आरामात बहुमत मिळेल आणि आम्ही ते मिळवत आहोत, अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतल्यानंतर दिली आहे. भाजप मध्य प्रदेशात बहुमतासह १३९ जागांवर आघाडीवर आहे. त्यानतंर काँग्रस ९० तर इतर एका जागेवर आघाडीवर आहेत. (MP Election live Results In Marathi)

MP Election Results 2023 :  मध्य प्रदेशात भाजपची 230 पैकी 137 जागांवर आघाडी 

मध्य प्रदेशात भाजप 230 पैकी 137 जागांवर आघाडीवर आहे तर सध्याच्या ट्रेंडनुसार काँग्रेस 54 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

MP Election Results 2023 :  भाजपने तिकीट दिलेल्या 'त्या' सात खासदारांचं स्थिती काय?

MP Election Results 2023 : भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशातील निवडणुकीच्या रणधुमाळीत सात खासदांना तिकीट देण्यात आलं होतं. यामध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे. तीनपैकी दोन केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते आणि नरेंद्र सिंह तोमर पिछाडीवर आहेत. मात्र, प्रल्हाद पटेल यांनी स्थिर आघाडी कायम ठेवली आहे. भाजपचे उर्वरित चार खासदार राकेश सिंह, राव उदय प्रताप सिंह, रीती पाठक आणि गणेश सिंह सातत्याने आघाडीवर आहेत.

MP Election Results 2023 : मध्य प्रदेशात बहुमतासह भाजपची मोठी आघाडी! भोपाळमध्ये पक्ष कार्यालयात जमले काँग्रेसचे नेते

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ आणि पक्षाचे इतर नेते भोपाळ येथील राज्य पक्ष कार्यालयात जमले आहेत. ताज्या अधिकृत निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, राज्यात भाजपने सध्याच्या अपडेटनुसार बहुमतासह मोठी आघाडी घेतली आहे, मध्यप्रदेशात भाजप १४० तर काँग्रेस ८६ जागांवर सध्या आघाडीवर आहे. तर चार जागांवर इतर आणि अन्य पक्षातील उमेदवार आघाडीवर आहेत. (MP Election live Results In Marathi)

MP Election Results 2023 : भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल - ज्योतिरादित्य शिंदे

MP Election Results 2023 :  स्वतःची पाठ थोपटून घेणारे बॅनर्स लावले जात होते. मी निकालाची वाट पाहा असं सांगितलं होतं. मला पूर्ण विश्वास आहे की जनतेचा आशीर्वाद भाजपला मिळेल. अजून निकाल येत आहेत अंतिम निकालाची आपण वाट पाहू. मला पूर्ण विश्वास आहे की, भाजपला संपूर्ण बहुमत मिळवेल असेही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. (MP Election live Results In Marathi)

MP Election Results 2023 : काँग्रेसची चिंता वाढली, छिंदवाडा येथून कमलनाथ पिछाडीवर; भाजपची 130 जागांवर आघाडी 

मध्यप्रदेशात सध्या भाजप 130 जागा तर काँग्रेसचे 96 जागांवर आघाडीवर आहेत. तर अन्य आणि इतर पक्षाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. यामध्ये छिंदवाडा जागेवरून काँग्रेसचे बडे नेते कमलनाथ हे सध्या पिछाडीवर असल्याचे माहिती मिळत आहे. काँग्रससाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो. (MP Election live Results In Marathi)

MP Election Results 2023 : मध्यप्रदेशात भाजपची मोठी आघाडी! काँग्रेस सुपडा साफ होणार?

मध्यप्रदेशात भाजपने मोठी आघाडी घेतली असून भाजपचे तब्बल 116 उमेदवार आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे 87 उमेदवार आघाडीवर आहेत. इतर आणि अन्य पक्षातील दोन उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे सध्यातरी मध्यप्रदेशात भाजप सत्ता स्थापन करणार असं चित्र दिसत आहे. (MP Election live Results In Marathi)

MP Election Results 2023 : मला मतदात्यांवर विश्वास, आम्ही आरामात...; निवडणूक निकालांपूर्वी कमलनाथ यांची प्रतिक्रिया

MP Election Results 2023 : विधानसभा निवडणूकांची मतमोजणी सुरू असून यादरम्यान मध्येप्रदेशातील काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अजून ट्रेंड अजून पाहिले नाहीत. मला मध्य प्रदेशातील मतदात्यांवर विश्वास आहे. ते आपलं भविष्य सुरक्षित ठेवतील. जागा मोजू नका, पण आम्ही आरामात जिंकू...अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Assembly Election Result 2023 : राघोगडमधून जयवर्धन पुढे तर कैलाश विजयवर्गीय हे इंदूर 1 मधून आघाडीवर

Assembly Election Result 2023 :  मध्य प्रदेशात सुरुवातीचे निकाल हाती येत आहेत त्यानुसार अनेक दिग्गज नेते निवडणुकीत आघाडीवर दिसत आहेत. राघोगडमधून काँग्रेसचे जयवर्धन सिंह, इंदूर 1 मधून कैलाश विजयवर्गीय पुढे आहेत.

MP Election Results : मध्य प्रदेशात भाजपची ५७ जागांवर आघाडी, काँग्रेसची ५३ धावांवर घोडदौड सुरू

मध्यप्रदेशात भाजप आणि काँग्रेस या दोन बड्या पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या २३० जागांपैकी सध्याच्या घडीला भाजप ५७ तर काँग्रेस ५३ जागांवर आघाडीवर आहे. तर तीन जागांवर इतर उमेदवार आघाडीवर आहेत.

MP Vote Counting has finally started : भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत! दोन्ही पक्षांची ४५ जागांवर आघाडी

MP Election Results 2023 : मध्य प्रदेशात विधानसभेचे सुरूवातीचे निकाल हाती येणे सुरू झाले आहे. राज्यातील एकूण २३० जागांपैकी 45 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसने देखील 45 जागांवर आघाडी घेतली आहे. तर एका जागेवर इतर आघाडीवर आहेत.

Assembly Election Result 2023 : निकालापूर्वीच काँग्रेसच्या दिल्लीच्या मुख्यालयाबाहेर जल्लोष!

Assembly Election Result 2023 : नवी दिल्ली - चार राज्यात विधानसभा निवडणूकीच्या निकालाच्या आधीच काँग्रेस मुख्यालयाबाहेर जल्लोष सुरू झाला आहे. वाजत गाजत कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.राहुल सब पे भारी है तभी तो भाजप जा रही है अशा आशयाचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत. बॅनर वर प्रभू श्री रामाचा मोठा फोटो. श्री हनुमानाच्या वेशातील व्यक्ती सर्वांचं लक्ष खेचून घेत आहेत.

MP Election Results : मतमोजणीला अखेर सुरूवात!

MP Election Results 2023 : छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. लवकरच निकाल हाती येण्यास सुरूवात होईल.

काँग्रेसला ऑपरेशन लोटसची भीती? विजयी उमेदवारांना तातडीनं भोपाळला येण्याच्या सूचना

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक 2023 चा निकाल अगदी काही तासांवर आला आहे. यादरम्यान निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना तातडीनं भोपाळला येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपकडून अपक्ष आणि अन्य पक्षाच्या उमेदवारांशी संपर्क साधला जात असल्याचा काँग्रेसचा दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अलर्ट मोडवर आहे.

MP Election Results : मध्य प्रदेशात निवडणूक निकालापूर्वीच काँग्रस कार्यालयाबाहेर विजयाचे बॅनर!  

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. यारपूर्वीच भोपाळमधील प्रदेश पक्ष कार्यालयाबाहेर काँग्रेस उमेदवारांचे अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान आज राज्यात कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

MP Assembly Election Result LIVE Update : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले आणि मतमोजणी आज (3 डिसेंबर) होणार आहे. यावेळी निवडणुकीत विक्रमी 77.15 टक्के मतदान झाले असून सर्व्हे एजन्सींनी मध्य प्रदेश निवडणुकीसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोल नुसार येथे काँग्रेस आणि भाजप यांच्यात 'काँटे की टक्कर' पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.