अकाेला : विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा शांत झाल्यानंतर सकाळी ७ वाजतापासून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून रिंगणातील ७० उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. विविध माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचे काम उमेदवारांनी केल्यानंतर आता मतदारराजा भावी आमदारासाठी मतदानाचा हक्क बजावेल.