Rajan Salvi : 'मविआचे 188 उमेदवार विजयी होतील, त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री आणि मी मंत्री होईन'

Rajapur MLA Rajan Salvi : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा मी निष्ठावंत शिवसैनिक आहे.
Rajan Salvi
Rajapur MLA Rajan Salvi esakal
Updated on
Summary

महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे सेनेकडून मलाच पसंती आहे. यापूर्वी पहिल्यांदा पोटनिवडणुकीत आणि त्यानंतर तीन निवडणुकीत विजयी झालो आहे.

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. राणे, शिंदे यांच्याशी जवळचे संबंध असतानाही मी गद्दारी केली नाही. शिवसेनेकडून तीन टर्म आमदार होतो. जनतेचे आशीर्वाद पाठीशी आहेत. राजापुरात जे प्रवेश दिसताहेत ते वरवरचे आहेत. आमची दुसरी फळी मजबूत आहे. राजापूरबरोबर रत्नागिरीतही माझे लक्ष राहणार असून, उदय सामंत यांचा या निवडणुकीत राजकीय अस्त करू, असा इशारा राजापूर-लांजा-साखरपाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.