Sillod Assembly Elections 2024: सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते जोशात; मंत्री सत्तारांच्या विरोधात हिंदुत्वाचा नारा !

Sillod Vidhan Sabha elections 2024: मंत्री अब्दुल सत्तार व भाजप अशी लढाई होण्याची शक्यता युतीधर्मामुळे पुन्हा एकदा संपुष्टात आली आहे.
Sillod Vidhan Sabha elections 2024
Sillod Vidhan Sabha elections 2024sakal
Updated on

सिल्लोड: विधानसभेचे पडघम वाजण्यास सुरूवात झालेली असतांना, सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात मात्र पारंपारिक प्रतिस्पर्धी मंत्री अब्दुल सत्तार व भाजप अशी लढाई होण्याची शक्यता युतीधर्मामुळे पुन्हा एकदा संपुष्टात आली आहे.

तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये मंत्री अब्दुल सत्तार व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धुसफुस बघावयास मिळत आहे. तर राज्य पातळीवर असलेल्या शिवसेना (शिंदे गट), भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) या युतीमुळे सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात ही जागा शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार लढणार हे नक्की.

परंतु मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हि जागा त्यावेळेसची शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे अनेक वर्षानंतर भाजपला ही जागा लढविता आली नाही. 2019 मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तारांना विरोध करित अपक्ष उमेदवार असलेल्या प्रभाकरराव पालोदकर यांच्या पाठीशी पुर्ण ताकद उभी केली होती.

त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता देखिल तशीच परिस्थिती असल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. तर महाविकास आघाडी देखिल याकडे लक्ष ठेवून आहे. तर भाजपचे चार मातब्बर पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या वाऱ्या करून महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संधान बांधणे सुरू केले आहे.

Sillod Vidhan Sabha elections 2024
Abddul Sattar : मेळघाटात अब्दुल सत्तारांच्या नावाची चर्चा; गरीब शेतकऱ्यांसाठी केलं मोठं काम

त्यामुळे विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर देखिल आली आहे. मागील तीन पंचवार्षिक निवडणूकांचा मतांचा फरक बघता भाजपच्या पराभवाचे गणित काहींच्या बंडखोरीमुळे बिघडल्याचे वास्तव आहे.

त्यामुळे याचा सारासार विचार करता हि निवडणूक लोकांमध्ये गेल्यानंतर मात्र चुरशीची होणार हे नक्की परंतु भाजप पदाधिकाऱ्यांचा जोर बघता व जागा शिंदे गटाला जाणार असल्याने इच्छूक भाजपातील पदाधिकारी महाविकास आघाडीचा पर्याय चाचपडत असल्याचे सुरू असलेल्या घडामोडींवरून दिसत आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.