Nagpur East Assembly Election : भाजपच्या ‘कृष्णा’ला अजित पवार गटाच्या आभा यांचे आव्हान, आभा पांडेंकडून अर्ज दाखल

Nagpur East Vidhan sabha election 2024 : पूर्व नागपूरमध्ये आभा पांडे यांनी भाजपाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे दोन नेत्यांमध्ये जुने वैर असल्याने भाजपाला आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
Nagpur East Vidhan sabha election 2024
Nagpur East Vidhan sabha election 2024sakal
Updated on

नागपूर : पूर्व नागपुरात उमेदवारीवरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये जुंपली असताना, भाजपचेही टेन्शन वाढले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पूर्व नागपुरातील नेत्या आभा पांडे यांनी बंड करीत भाजपाचे उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात गुरुवारी (ता.२४) उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपाला आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.