बीसीसीआयचे सचिव पद कुणाला दिले हे पहिले सांगावे. जर कोणत्या क्रिकेटरला दिले असते तर बीसीसीआयचे आता चांगले झाले असते. परंतु या ठिकाणाहून सगळं पळवायचं हे फक्त भाजपला माहिती आहे. ज्यांनी बाळासाहेबांचा पक्ष तोडला फोडला आणि चोरून नेला त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपसह अमित शाहांवर टीका केली आहे.