महाराष्ट्रात विधानसभेची लगबग सुरू आहे. सर्वच पक्ष विधानसभेची जय्यत तयारी करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचारही जोरदार सुरू आहेत. यातच अनेक नेतेमंडळी धक्कादायक वक्तव्य करत आहेत. अशातच आता आदित्य ठाकरेंनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील २०२२ च्या बंडाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. यात त्यांनी त्यावेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना फोन लावून रडले असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.