Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सभेचे माजी नेते राजन शिरोडकर यांचे आज मंगळवारी निधन झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले राजन शिरोडकर यांच्या निधनामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातील दादर आणि पश्चिम कुंभारवाडी इथल्या दोन सभा रद्द केल्यात. कोहिनूर मिल प्रकरणात राजन शिरोडकर यांची ईडीकडून चौकशी झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचा संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांचे ते वडील होते.