महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा गेली आहे. त्यामुळे आता हाताऐवजी तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह असणार आहे.
Ichalkaranji Assembly Election 2024 : तब्बल ४६ वर्षांनंतर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) ‘हात’ चिन्ह दिसणार नाही. आतापर्यंत गेल्या दहा निवडणुकांत मतपत्रिकेत, मतदान यंत्रात हे चिन्ह होते. त्यापैकी पाच निवडणुकांमध्ये या चिन्हाला विजय मिळाला आहे. त्यामुळे या चिन्हाचा नेहमीच या मतदारसंघात दबदबा राहिला आहे. आता मात्र ही जागा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘हात’ चिन्ह गायब होणार आहे.