Kinwat Assembly Election 2024 : किनवटमध्ये वाघदरी गावात स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर मतदान केंद्र अखेर मंजुर

Kinwat Vidhan Sabha Election 2024 : वाघदरी गावात पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना समस्यांचा सामना करावा लागत होता. सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी गावात जाऊन मतदान केंद्रास मान्यता मिळवून दिली, त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Kinwat Vidhan Sabha elections 2024
Kinwat Vidhan Sabha elections 2024sakal
Updated on

किनवट : पक्का रस्ता नसलेल्या डोंगर-दऱ्यातून पायपीट करून ये-जा करावे लागणाऱ्या तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगरी, सीमावर्ती गाव म्हणजे वाघदरी. या गावात स्वतः पायी चालत जाऊन समस्या जाणून घेऊन विधानसभा निवडणुकीकरिता शासनाकडे पाठपुरावा करून मतदान केंद्रास मान्यता मिळवून दिल्याने ग्रामस्थांनी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांचे आभार मानले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.