अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज अखेरच्या दिवशी जिल्ह्यात एकूण २८८ उमेदवारांनी ४१५ अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील बहुतेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी (ता. ३) कितीजण मैदानातून माघार घेतात, याबाबत नागरिकांमधून तर्क-वितर्क लावले जात आहेत. अपक्षांची संख्या जास्त असल्याने त्यांची मनधरणी करण्यात नेत्यांची दमछाक होणार आहे.