महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रातील निवडणूक ही प्रामुख्याने दोन आघाड्यांमध्ये आहे. एका बाजूला सत्तेत असलेली महायुती आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. यातच राज्यातील हाय होल्टेज लढत अशी बारामतीमध्ये होत आहे. या लढतीत पवार काका-पुतण्या आमनेसामने आहेत. मतदान सुरू होताच अजित पवार आणि युगेंद्र पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी दोघांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जिंकण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.