Ajit Pawar: अल्पसंख्याकांविरोधात बोलणे चुकीचे; नीतेश राणेंचा उल्लेख टाळत अजित पवारांनी फटकारले

Latest Kokan News: पवार आणि तटकरे यांनी भाष्य केले. मात्र, आमदार नीतेश राणे यांचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले.
Ajit Pawar: अल्पसंख्याकांविरोधात बोलणे चुकीचे; नीतेश राणेंचा उल्लेख टाळत अजित पवारांनी फटकारले
Updated on

Latest Chiplun News: ‘‘महायुतीचे काही नेते बेताल वक्तव्य करत आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मताशी सहमत नाही,’’ असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले.

भाजपचे आमदार नीतेश राणे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत ते बोलत होते. नीतेश राणे मागील काही दिवसांपासून अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून राज्यात त्यांच्या विरोधात बोलत आहेत. यावर पवार आणि तटकरे यांनी भाष्य केले. मात्र, आमदार नीतेश राणे यांचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले.

Ajit Pawar: अल्पसंख्याकांविरोधात बोलणे चुकीचे; नीतेश राणेंचा उल्लेख टाळत अजित पवारांनी फटकारले
अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

अजित पवार म्हणाले, ‘‘सर्वांनी आपले विचार मांडावेत, पण ते मांडत असताना कोणत्याही समाजात दुही निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सर्वांनी जपला पाहिजे.’’

‘‘राजकीय पक्षातील एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोलते, तेव्हा त्याच्यामुळे समाजात दुही निर्माण होते. हे होता कामा नये. तुम्हाला तुमची विचारसरणी मांडायची असेल तर तुम्ही मांडू शकता; परंतु तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजात दुही निर्माण करता, जे समाजासाठी चांगले नाही, ’’ असे पवार यांनी सुनावले.

Ajit Pawar: अल्पसंख्याकांविरोधात बोलणे चुकीचे; नीतेश राणेंचा उल्लेख टाळत अजित पवारांनी फटकारले
Ajit Pawar : नेत्यांनी बोलताना भान ठेवावे; वाचाळवीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानपिचक्या

चुकीच्या विधानांना विरोध करणार

तटकरे म्हणाले की, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. अल्पसंख्याक समाजाबद्दल चुकीचे बोललेले कदापी खपवून घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा गोष्टींचा तीव्र विरोध करत राहील. कठोर शब्दांत आम्ही त्यांचा विरोध करू. बहुजन समाजाचे हित जपण्यासाठी सत्ता हवी आहे. म्हणून आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. केंद्रात आणि राज्यात एका विचाराची सत्ता असेल तर विकासकामे करता येतात. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राचा विकास करू, यात शंका नाही.

Ajit Pawar: अल्पसंख्याकांविरोधात बोलणे चुकीचे; नीतेश राणेंचा उल्लेख टाळत अजित पवारांनी फटकारले
Ajit Pawar: अजित पवारांच्या फेसबुक पेजचे व्हायरल होणारे स्क्रीनशॉट खोटे; राष्ट्रवादी पक्षाकडून खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.