Ajit Pawar: तेव्हा मी हृदयातून बोललो होतो...बारामती विधानसभा लढणार? अजित पवारांनी 'जय' बाबत मन मोकळं केलं, वाचा काय म्हणाले?

Ajit Pawar Clarifies Baramati Candidacy Amidst Election Speculations: अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याबद्दल चुक झाल्याची कबुली लोकांच्या चर्चेचा विषय ठरली होती.
Ajit Pawar addresses questions about contesting the Baramati seat in the upcoming Maharashtra Assembly elections.
Ajit Pawar addresses questions about contesting the Baramati seat in the upcoming Maharashtra Assembly elections.esakal
Updated on

Baramati Political News Updates: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती आघाडीतील जागावाटप, पक्षाची धोरणं आणि वैयक्तिक निर्णयांवर भाष्य केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, पक्षाच्या धोरणांवर अजित पवार यांनी जोर दिला. त्यांनी नुक्त्याच्या एका वृत्तपत्राला मुलाखत दिली.

बारामतीतून लढणार का?-

इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, ते बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार का नाही, याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. "मी बारामतीत सात-आठ वेळा निवडणूक लढली आहे. मात्र, पक्षाचा निर्णय अंतिम असेल. माझ्या मुलाला, जयला, उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, हे खरे आहे, पण अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही," असे ते म्हणाले.

सुप्रिया सुळेविरोधातील निवडणूक-

अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देण्याबद्दल चुक झाल्याची कबुली लोकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. "मी नेहमी मनापासून बोलतो. मला असं वाटलं की, मला माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीचा होता. तसंच, मलवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर मी राज्याची माफी मागितली होती. शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत, त्यांचं महत्त्व आम्ही जाणतो," असं त्यांनी सांगितलं.

Ajit Pawar addresses questions about contesting the Baramati seat in the upcoming Maharashtra Assembly elections.
Ajit Pawar: विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री पदाबाबात अजित पवारांचे मोठं भाष्य! शिंदे-फडणवीस टेन्शनमध्ये, नेमकं काय म्हणाले दादा?

भाजप-शिवसेनेसोबतचा विचारसरणीचा ताळमेळ?

महायुतीतील भाजप आणि शिवसेनेसोबत काम करताना विचारसरणीच्या ताळमेळाबद्दल पवारांनी सांगितलं की, "आम्ही स्पष्ट केलं होतं की, आमची विचारधारा धर्मनिरपेक्ष आहे आणि त्यात तडजोड होणार नाही. पण लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी शिवसेनेसोबत दोन अडीच वर्ष काम केलं, तेव्हा हा प्रश्न का विचारला गेला नाही? आता आम्ही विकासाच्या अजेंड्यासाठी एकत्र आलो आहोत, तर धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरचं लोकांचे लक्ष वेधलं जातं."

अजित पवारांनी सांगितलं की, त्यांच्या पक्षाला धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असून त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. महायुती आघाडीत सर्व धर्मातील लोकांसाठी योजनांचा समावेश असेल आणि प्रत्येक मतदारसंघात पक्षाचा बळ पाहूनच निर्णय घेतला जाईल.

Ajit Pawar addresses questions about contesting the Baramati seat in the upcoming Maharashtra Assembly elections.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर टेन्शन नको! आता थेट साडेचार हजार येणार खात्यात, शिंदे भाऊंनी दिली माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.