Ajit Pawar Baramati: "बारामतीला मी सोडून कोणीतरी आमदार मिळाला पाहिजे", अजित पवारांचे विधान अन् कार्यकर्त्यांचा गोंधळ

Ajit Pawar Baramati Vidhan Sabha Election: गेल्या काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून लढणार नाहीत अशा चर्चा राजकीय वर्तुळात सतत होत असतात.
Ajit Pawar Baramati Vidhan Sabha Election
Ajit Pawar Baramati Vidhan Sabha ElectionEsakal
Updated on

गेल्या काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून लढणार नाहीत अशा चर्चा राजकीय वर्तुळात सतत होत असतात. अशात आता बारामतील एका कार्यक्रमात, "बारामतीकरांना माझ्याशिवाय दुसरा कोणीतरी आमदार मिळायला पाहिजे," असे विधान केले. यानंतर ते विधानसभा लढणार नसल्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी हे विधान केल्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी गोंधळ करत हे मान्य नसल्याचे म्हटले.

यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अजित पवार म्हणाले, "बारामतीकरांना आता माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही माझ्या 1991 ते 2024 या काळातील कारकिर्दीची तुलना करा. आम्ही सकाळपासून कामाला लागतो. आता आम्ही सकाळी उठतो काहीजण यावरुन आमची चेष्टा करतात."

विधानसभेसाठी तयारी

दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातील काही भागांनंतर आता ही यात्रा पुन्हा सुरू होणार आहे.

दरम्यान महायुतीमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाल्यानंतर आता भाजप-शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येणार आहेत. त्यामुळे अधून-मधून भाजप-सेनेचे नेते राष्ट्रवादीवरच टीका करत असतात.

Ajit Pawar Baramati Vidhan Sabha Election
Ajit Pawar NCP New Song: जुना काळ बदलला आता वेळ बघा...दादाचा वादा; राष्ट्रवादीचं नवं भन्नाट गाणं पाहिलं का?

दुसरीकडे मे-जूनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे अपयश आले होते. त्यांनी लढवलेल्या 4 जागांपैकी एकाच जागेवर त्यांना जिंकता आले होते. तर शरद पवार यांच्या राष्ट्रावादीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून 10 जागा लढत 8 जगांवर विजय मिळवला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर शरद पवार यांचे आव्हान असणार आहे.

Ajit Pawar Baramati Vidhan Sabha Election
MIM Maharashtra: विधानसभा जिंकण्याचा प्लॅन ठरला, जलील यांनी सांगितली भूमिका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.