विधानसभा निवडणुकेची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबत सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात महाविकास आघाडी की महायुतीचे सरकार येणार हे 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार यावरही चर्चा रंगलीये, पण त्याआधीच पुण्यात अजित पवारच मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले आहेत.