Ajit Pawar: विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री पदाबाबात अजित पवारांचे मोठं भाष्य! शिंदे-फडणवीस टेन्शनमध्ये, नेमकं काय म्हणाले दादा?

Ajit Pawar's Take on Baramati Assembly Election and Chief Ministership: यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाच निवडणूल लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहेत. तर भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मोठी मागणी आहे. कारण ताकद असताना, सर्वाधिक संख्याबळ असताना त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले.
Ajit Pawar discusses the upcoming elections, Baramati seat, and Mahayuti’s chief ministerial candidate.
Ajit Pawar discusses the upcoming elections, Baramati seat, and Mahayuti’s chief ministerial candidate.esakal
Updated on

मुंबई: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या भूमिकेवर आणि बारामती विधानसभा निवडणुकीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी महायुतीतील मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही स्पष्ट निर्णय होण्याआधी पक्षांना बहुमत मिळणं आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यांचं विधान महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाचं मानलं जात आहे, आणि यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या राजकीय गणितांवर सर्वांचे लक्ष असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.