महाराष्ट्रातील दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. महायुतीच्या नेत्यांनी माध्यमांसमोर येऊन विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत. यात अजित पवार आधी बोलले. विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला साथ दिल्याचे ते म्हणाले. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे बोलत असताना अजितदादांनी उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. यावेळी हशा उपस्थितांमध्ये हशा पिकला आहे. त्यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.