Ajit Pawar Met Prakash Ambedkar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या धामुधमीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर बरे होऊन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गुरुवारी 31 ऑक्टोबरच्या पहाटे त्यांना छातीत दुखू लागल्याने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.