Latest Indapur News : गेल्या पाच वर्षांच्या काळात इंदापूर तालुक्याला 5 हजार 495 कोटी 34 लाखांचा विकास निधी दिला असून, आणखी इथून पुढे राहिलेली कामे करण्याची ताकद, हिंमत आणि धाडस माझ्यात आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात आहे.
आम्ही आमची जबाबदारी पार पाडली आहे. इथून पुढच्या काळात महायुतीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहण्याचे सांगत आमदार दत्तात्रय भरणे हेच इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असतील, याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी इंदापूर येथे दिले. यामुळे हर्षवर्धन पाटलांचे काय होणार हा प्रश्व विचारला जात आहे.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इंदापूर शहरात 90 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार जीवन बनसोडे, कार्यकारी अभियंता अमोल पवार, गट विकास अधिकारी सचिन खुडे, नगर परिषदेचे मुख्यधिकारी रमेश ढगे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगरोत्थान महाअभियानांतर्गत इंदापूर नगर परिषदेच्या हद्दीत बस डेपो ते राज्य महामार्ग क्र.71, बारामती रस्ता ते क्रीडा संकुल, बारामती रस्ता ते तरंगवाडी, संतोष बामणे यांचे घर ते क्रीडा संकुलापर्यंतचा रस्ता ते बायपासपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, आरसीसी गटर करणे, खुळे चौक ते मंगेश पाटील पेट्रोल पंप (कॅनल रस्ता) 4 पदरी सिमेंट काँक्रीट रस्ता, आरसीसी गटर, पद रस्त्याचे कामाचे तसेच मल नि:सारण प्रणाली अंतर्गत गावठाण भागातील 22.78 कि.मी. आणि हद्दवाढ भागातील 29.24 कि.मी. भूमिगत गटर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी संवर्धन करणे व हजरत चांदशहावलीबाबा दर्गा सुशोभीकरण कामाचेही भूमिपूजन करण्यात आले.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून यासाठी 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे यामध्ये रामवेस ते गढीपर्यंत ऐतिहासिक देखावाही निर्माण करण्यात येणार असून गढीवरील हजरत चांदशहावलीबाबा दर्गाचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.यामुळे गढीचे रूप पालटणार असल्याने इंदापूरच्या वैभवात भर पडणार आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.