Prakash Bharsakle Won Akot Assembly Election 2024 final result: अकोट विधानसभा मतदारसंघातून तूल्यबळ दुहेरी लढतीत भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी!

Akot West Assembly Election 2024 result: अकोट विधानसभा मतदारसंघात स्थानिक प्रश्नांवर निवडणूक झाली. विकासकामे, मूलभूत सुविधा, दलित आणि मुस्लिम समाजाच्या समस्या आदी मुद्द्यांवर उमेदवारांवर टीका झाली.
Akot West Assembly Election 2024 result
Akot West Assembly Election 2024 resultesakal
Updated on

अकोट विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रकाश पाटील भारसाकळे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे महेश गणगणे यांच्यात तूल्यबळ लढत झाली. या निवडणुकीत मतविभागणी निर्णायक ठरली. अकोट मतदारसंघ हा नेहमीच संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी झालेल्या प्रत्येक निवडणुका जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतात.

या मतदारसंघात भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झाले आहेत. प्रकाश भारसाकळे यांना ९३ हजार ३३८ मते मिळाली. १८ हजार ८५१ मतांनी त्यांचा विजय झाला. काँग्रेसचे महेश गणगणे यांना ७४ हजार ४८७ मते मिळाली. वंचितचे दीपक बोडखे यांना ३४ हजार १३५ मते मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.