Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. विरार येथील एका हॉटेलमध्ये चार तास हायहोल्टेज ड्रामा सुरु होता. बविआच्या कार्यकर्त्यांनी बॅगेतले पैसे दाखवले आणि थेट आरोप केले. त्यानंतर हॉटेलमध्ये पोलिस आणि निवडणूक विभागाचे लोक दाखल झाले. तावडेंनी पैसे वाटपाचा आरोप फेटाळून लावला होता.