Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील महाराष्ट्र दौ-यावर असून त्यांनी सकाळी मुंबईत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला तर दुपारी जळगावच्या रावेरमध्ये प्रचारसभा घेतली.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सत्तेच्या भुकेने आंधळी झाली असून, ते सत्तेत आले तर लाडकी बहिण योजना बंद करतील असा हल्लाबोल केला. आम्ही सत्तेत येताच 100 दिवसांत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे राज्य बनविणार असल्याचेही शाहा म्हणाले.