CM & DCM Meet Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी समन्वयावर चर्चा केली. आगामी निवडणुकीत 'हिंदुत्व' याच आधारावर भाजप आपला प्रचार करत आहे, असा संदेश दिला.
मुंबई : भाजपचे संकल्पपत्र घोषित करण्यासाठी मुंबईत आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करत अधिक समन्वयाची गरज व्यक्त केली असल्याचे समजते.