केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्यादरम्यान दिलेल्या काही वक्तव्यामुळे संभाजी ब्रिगेडने नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास यांच्या कथित भेटीवरून संभाजी ब्रिगेडने शहांना खुलं चॅलेंज दिलं आहे. या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी कडक शब्दात आपला विरोध व्यक्त करत, शहांना शिवरायांचा खरा इतिहास सांगण्याचे आव्हान दिले आहे.