Amit Shah : शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राला काय दिले? अमित शहा यांचा सवाल; जनतेला जाब विचारण्याचे आवाहन
Satara Vidhan Sabha Election 2024 : अमित शहा यांनी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर महाराष्ट्राला योग्य न्याय न मिळाल्याचा आरोप केला. जनतेने जाब विचारावा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
विंग (जि.सातारा) : केंद्रात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण हे २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे सत्तेत होते. त्या काळात त्यांनी महाराष्ट्राला केवळ एक लाख ९१ हजार कोटी रुपये दिले. मोदी सरकारही २०१४ ते २०२४ पर्यंत दहा वर्षे सत्तेत आहे.