मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदा उतरले आहेत. यासाठी त्यांनी माहिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मनसे आणि राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला मदत केली होती. त्यामुळे आता महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा द्याव यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान भारतीय जनता पक्षाने आधीच ते अमित ठाकरे यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यास आग्रही आहेत. पण शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर मात्र धनुष्यबानावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी आजच स्पष्ट केले आहे की, ते निवडणुकीतून माघार घेणार नाहीत.