रूपेश बुट्टेपाटील, आंबेठाण: वारकरी असणे किंवा नसणे हा निवडणुकीचा मुद्दा नसावा, तर विकास हा मुद्दा असावा. पाच हजार कोटींचा निधी मोहिते पाटलांनी तालुक्यात आणला आहे. तालुक्याने मोहिते यांना आमदार केले. आता त्यांना नामदार करा आणि काळे यांचं डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी वासुली फाटा येथे केले.