अमरावती : जिल्ह्यातील चार मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरू लागल्या आहेत. यातील तीन मतदारसंघांतील पहिल्या टप्प्यात तिरंगी वाटणाऱ्या लढती शेवटच्या टप्प्यात एकास एक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर तिवसा या मतदारसंघात सुरवातीपासूनच एकास एक लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.