मुंबई: महाविकास आघाडीकडून अपेक्षाभंग झाल्यामुळे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी चौथी आरक्षणवादी आघाडी उभी केली आहे. राज्यातील छोट्या-मोठ्या पक्षांची मोट बांधून त्यांनी २०० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर मुंबईतील १७ जागांवर त्यांनी आपले उमेदवार दिले आहेत.